गेवराईचा बंगला माझ्या नावावर कर : पूजा

माजी उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणात ; नर्तकीकडे महागड्या साड्या, चारचाकी गाडीचा शाैक आणि कला केंद्रात

Sep 11, 2025 - 12:20
 0  231
गेवराईचा बंगला माझ्या नावावर कर : पूजा

सोलापूर / बार्शी : बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच आणि व्यवसायिक गोविंद बर्गे (वय 34) यांनी आत्महत्या केली. गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले असून पोलिसांनी या प्रकरणी कला केंद्रात काम करणाऱ्या 21 वर्षीय पूजा गायकवाड हिच्यावर गुन्हा दाखल केला. पूजाची रवानगी आता पोलिस कोठडीत करण्यात आली. मात्र, गोविंद यांच्या कुटुंबियांनी अत्यंत गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली. फक्त हेच नाही तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचाही दावा कुटुंबियांकडून करण्यात आलाय. या प्रकरणात सातत्याने धक्कादायक आरोप होताना दिसत आहेत. गोविंद याच्या हातात प्लॉटिंगचा खेळता पैसा होता. गोविंदला कला केंद्रात जाण्याची सवय होती आणि त्याची भेट थापडीतांडा कला केंद्रातच पूजासोबत झाली.

पूजाला पाहून गोविंद तिच्या प्रेमात पडला पूजासाठी दररोजच गोविंद हा कला केंद्रात जात होता. यादरम्यान पूजाला खुश करण्यासाठी गोविंदने तिला महागडा आयफोन देखील गिफ्ट केला. मात्र, पूजाचे पोट फक्त त्याच्यावरच भरले नाही. तिने गोविंदकडून महागडे दागिने देखील घेतले. पूजाचा डोळा गोविंदच्या गेवराईच्या बंगल्यावर होता. त्यासाठी ती त्याच्या मागे तगादा सतत लावत होती. आता पूजाबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे येतंय.
पूजा हिचे महागडे शाैक होते. तिला बसण्यासाठी चारचाकी गाडी लागत. शिवाय महागड्या डिझाईनर साड्या, सोन्याचे अनेक दागिने असे तिचे शाैक होते. कला केंद्रात नर्तकी म्हणून काम करणाऱ्या पूजा गायकवाड हिच्याकडे अनेक महागड्या साड्या असल्याचीही माहिती मिळतंय. गोविंदने आतापर्यंत तिला फक्त मोबाईलच नाही तर अनेक महागडी दागिने दिल्याचेही कळतंय. पूजा गायकवाड हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या अनेक रिल्समध्ये तिच्या महागड्या साडया दिसत आहेत.

गोविंद हा पूजाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की, त्याला काहीच कळत नव्हते. तो पूजाला प्रत्येक म्हणलेली गोष्ट घेऊन देत. गेवराईचा बंगला माझ्या नावावर कर म्हणून पूजाने गोविंदच्या मागे तगादा लावला होता. मात्र, गोविंद हा बंगला आपल्या नावावर करत नसल्याने पूजा चिडली होती आणि तिने गोविंदसोबतचा संपर्क तोडला होता. यानंतर गोविंद हा थेट पूजाच्या घरी पोहोचला. मात्र, तरीही पूजा ऐकण्यास तयार नव्हती. शेवटी गोविंद याने थेट पूजाच्या घराच्या परिसरात आपल्या चारचाकी गाडीमध्ये बसून स्वत:वर गोळी झाडली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow