भाजपात इनकमिंग चेहरे, जे नाहीत कार्यक़ारिणीत त्यांना तिकीटे?
शहराध्यक्षांचा धमाका: आमदारांचा, इच्छुकांचा दबाव, आणि दमन! रिक्त जागांवर अनेकांचे लक्ष्य

(विजयकुमार पिसे)
लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिका निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर भाजपात इनकमिंगची वाढलेली गर्दी पाहता सोलापूर शहर कार्यकारिणीत त्या चेहर्यांना संधी. ज्यांना नाही, त्यांना तिकीटाची गॅरंटी!
शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांचा धमाका. म्हणजे, लोकप्रतिनिधींचा व इच्छुकांचा दबाव आणि दमन या पलीकडे जाऊन त्यांनी आपली टीम बुधवारी जाहीर केली. मे मध्ये तडवळकर यांची शहराध्यक्षपदी निवड ही अनपेक्षितच. त्यांच्या (120) टीममध्येही अनेक अनपेक्षित चेहरे आहेत. जे भाजपात नाहीत, किंवा निवडणुकांमध्ये अडचणी आणल्या, बंड केले. अशांंनाही पदे मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कार्यकारिणीत काही पदे रिक्त आहेत, त्यावर अनेकांचे लक्ष्य असून पक्ष इतका मोठा असूनही जागा रिकाम्या का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
कार्यकारिणीत 9 उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस,12 चिटणीस आणि 60 कार्यकारिणी सदस्य. इनकमिंग झालेले देवेंद्र भंडारे,संजय साळुंके,सुधा अळ्ळीमोरे,रंजना चाकोते, प्रक़ाश राठोड यांना मोठी जबाबदारी दिली आहे. एक उपाध्यक्ष, सरचिटणीस, किसान आघाडी, बुध्दीजीवी आघाडी, दक्षिण भारत व ट्रान्सपोर्ट आघाडी या जागा रिकाम्या आहेत. वयोगटाचा विचार केला तर सरासरी सर्वाधिक वयोमान 70 आणि किमान 30 असून, ज्येष्ठांचा भरणा अधिक. भाजपा बुध्दीजीवींचा पक्ष, पण या प्रक़ोष्ठासाठी सक्षम व्यक्तीचा शोध जारी आहे. त्यामुळे नियुक्ती झालेली नाही.
यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये अडचणी निर्माण केलेले काही घटक यादीत आहेत. तसेच ज्यांचे पक्षकार्यात, निवडणुकीत योगदान काय? असा सवाल पत्रकारांनी आज उपस्थित केलाच. ती मंडळी कोण? यादीवर नजर टाकली तर ती झर्रकन डोळ्यासमोर येतील.
स्थानिक आमदारांचा दबाव आहे, त्यामुळे कार्यकारिणी लांबली, अशी चर्चा होती, (ना आगा, ना पिछा, ना मधला) पण त्यांचा दबाव, शिवाय इच्छुकांची गर्दी आणि दमन झुगारल्याचे लक्षात होते. त्यामुळे शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची कार्यकारिणी म्हणजे धमाका होय. आणि आव्हान देणार्यांसाठी रोखठोक जवाबही.
जाधव, डांगरे, महागावकर उपाध्यक्ष
पक्षात चर्चेतील तीन प्रमुख चेहरे अनंत जाधव, मोहन डांगरे, अविनाश महागावकर उपाध्यक्ष झाले आहेत. सरचिटणीस पदासाठी त्यांची चर्चा ऐरणीवर होती. गत तीन टर्मपासून सरचिटणीस पदापासून वंचित जाधव यांच्या राजीनाम्याची वार्ता दुपारनंतर व्हायरल झाली.
संघटनेतील सहकार्याची निर्णायक चर्चा
निवडणूक आणि संघटनेत सहकार्य अपेक्षित. त्याचे परिणाम नंतर दिसतात. पक्ष कार्यालयात सकाळी कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आणि सायंकाळी महापालिकेत (सहकार्याच्या मोबाईल संभाषणाची) निर्णायक चर्चा समोर आली. त्यामुळे संघटनेतील सहकार्य हा कळीचा मुद्दा राहणार आहे.
त्यांना तिकीटाची गॅरंटी...
चांगल्या कामाची दखल नेहमीच घेतली जाते. त्यामुळे बढती मिळेल, या विश्वासाने निश्चिंत राहिलेल्यांची निराशा झाली. कार्यकारिणीत आहेत, त्यांना तिकीट नाही, जे यादीत नाहीत, त्यांना मात्र तिकीटाची गॅरंटी असे सोपे समीकरण मांडले जात आहे. पण तिकीटात देखील निराशा आली तर...?
What's Your Reaction?






