मोदींची चेष्टा मामाला पडली महागात;...आणि त्यांनी नेसवली भर बाजारात साडी!
मोदींची चेष्टा मामाला पडली महागात;...आणि त्यांनी नेसवली भर बाजारात साडी!

(विजयकुमार पिसे)
सोशल मिडियाचा गैरफायदा घेऊन मोदींची चेष्टा करण्याचा प्रयत्न करणार्या मामावर भलतीच आपत्ती ओढवली आणि भर बाजारात त्या मामाला साडी नेसावी लागली. त्यामुळे चेष्टेखोर सोशल मिडियाच्या आहारी गेलेले सावधान... अन्यथा....!
22 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटीचा उत्सव साजरा करण्याचे देशवासीयांना आवाहन केले. सर्वत्र त्याविषयी आनंद व्यक्त होत असताना त्यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रकार समोर आला. ही बाब काही सूज्ञ मंडळींच्या लक्षात आली आणि त्यांनीही त्याच पध्दतीने त्या मामाचे भर बाजारात वस्त्रहरण केले, साडी नेसलेला मामा सोशल मिडियावर व्हायरल केला, हे मामा आहेत, डोंबिवलीतील 72 वर्षीय ज्येष्ठ काँग्रेसी नेते प्रकाश उर्फ मामा पगारे.
अंगात खुमखुमी असलेल्या या नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गाफील ठेवत (मामा) बोलावून घेतले. व त्यांना भर रस्त्यात साडी नेसवून त्यांचा यथोचित सत्कार केला. या घटनेनंतर काँग्रेसी आक्रमक झाले. दरम्यान आमच्या वरिष्ठ नेत्यांची बदनामी केल्यास त्यांची सुद्धा हीच गत करण्याचा इशारा भाजपाच्या पदाधिकार्यांनी दिला. या घटनेनंतर आपल्याशी गैरवर्तन करणार्या भाजपाच्या पदाधिकार्यांवर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने आपण पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे मामा पगारे म्हणाले.
गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून काँग्रेसच्या विचारधारेवर चालणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे भाजपाच्या कुरघोड्यांना भीक घालणार नाही. आपल्या व्यक्ति स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न भाजपाच्या झुंड टोळीने केला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. यासाठी आपण आग्रही असणार आहोत, असेही मामा म्हणाले. मोदी असो वा अन्य कुणीही.. व्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार करणे म्हणजे सोशल मिडियावर चेष्टा करणे नाही. अन्यथा ती अशा प्रकारे महागात पडू शकते.
What's Your Reaction?






