प्रभाग 26 मधील मीना नगर येथे काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन
मा. नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
सोलापूर : प्रभाग क्रमांक 26 मधील मीना नगर येथे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा उपक्रम शक्य झाला आहे.
मीना नगर हद्दवाढीपासूनच पाण्याची पाइपलाईन, ड्रेनेज लाईन, अंतर्गत रस्ते व दिवाबत्ती अशा मूलभूत सुविधा अभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिक शंभर टक्के कर भरत असूनही सुविधा न मिळाल्याने नाराजी होती.
सन 2017 मध्ये नगरसेविका म्हणून सौ. राजश्री चव्हाण निवडून आल्यानंतर जागरूक नागरिक श्री. प्रकाश चव्हाण यांच्या पुढाकाराने या समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर प्रथम प्राधान्याने पाण्याची पाइपलाईन टाकण्यात आली, नंतर सुवर्ण जयंती नगरोथान योजनेतून ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर निधी उपलब्ध करून घेत काँक्रीट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आम्ही गेली 20-30 वर्षे येथे वास्तव्यास आहोत. कर नियमित भरतो, परंतु सुविधा मिळत नव्हत्या. नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी आमच्या समस्या तातडीने सोडवून दिल्या. आता दिवाबत्तीचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे.”
या कार्यक्रमाला प्रकाश चव्हाण, रमेश राजपूत, रुपेश राठोड, शशिकांत शिंदे, साहिल चव्हाण, बिराप्पा बिराजदार, रेखा चव्हाण, अंबिका बंडगर, लंगोटे ताई, पवार ताई, प्रशांत काळे, ठेकेदार अलकुंटे तसेच नागरिकांच्या मदतीला सदैव तत्पर असलेले भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण उपस्थित होते.
What's Your Reaction?