शनिवार वाडा परिसरात अखेर फडकला भगवा!

वादग्रस्त मजार हटावसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, खा.मेघा कुलकर्णी यांनी सुनावले, नमाज पठण होतंय, पुणे प्रशासन करतंय काय?

Oct 19, 2025 - 20:54
Oct 20, 2025 - 00:31
 0  420
शनिवार वाडा परिसरात अखेर फडकला भगवा!

(विजयकुमार पिसे)

ऐतिहासिक वारसा शनिवार वाडा परिसरात नमाज पठण होत असल्याची बाब उघड होताच रविवारी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. पोलीस प्रशासनाचा विरोध डावलून अखेर तिथे भगवा फडकवला व शिववंदना करून संस्कृतीचा सन्मान जपला.

   पुण्यात सारसबाग परिसरात नमाज पठणानंतर असाच प्रकार शनिवार वाडा परिसरात होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. वादग्रस्त मजार हटवा आणि संस्कृतीचा सन्मान राखा, असे पोलीस प्रशासनाला सुनावले.

    शनिवार वाडा परिसरात नमाज पठण होतंय ही बाब लक्षात येताच तिथे आंदोलक जमले. काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी आंदोलकांना भगवा फडकवण्यास मज्जाव करीत संबंधित जागा ही पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहे. पुरातत्व अधिकारी येत आहेत, असे सांगून त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमक आंदोलकांनी भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार केला.

    दरम्यान भाजप खा.मेधा कुलकर्णी यांनी देखील याबाबतचे व्हिडीओदेखील शेअर केले. आंदोलकांकडून आधी गोमुत्र शिंपडून परिसराचं शुद्धीकरण केले. यानंतर शिववंदना करण्यात आली.  

आंदोलक आक्रमक झाल्यामुळे तणावाचे वातावरण होते. यावेळी जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांचा गजर सुरू होता. या ठिकाणी हिरवा झेंडा फडकवला जातो, नमाज पठण केलं जातं तेव्हा पोलिसांचं लक्ष कुठे असतं? असा सवाल आंदोलकांनी केला. त्यामुळे भगवा फडकवण्यास पोलिसांचा कोणताही विरोध असू नये, असं आंदोलकांनी सुनावले. आक्रमक पवित्रा घेताच परिसरात भगवा झेंडा फडकवण्यास परवानगी मिळाली. दरम्यान ही स्थिती लक्षात घेता शनिवार वाडा परिसरात माघी गणेशोत्सव साजरा होत होता, तो पुन्हा सुरू करण्याचे आवाहन खा.मेघा कुलकर्णी यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow