जागतिक पुरुष दिन उत्साहात; चंदूकाका सराफ ज्वेलर्सतर्फे विविध उपक्रम
भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्या हस्ते चंदूकाका सराफ ज्वेलर्स विवाह तस्मे बोर्डाचे उद्घाटन
सोलापूर : जागतिक पुरुष दिनानिमित्त चंदूकाका सराफ ज्वेलर्सतर्फे 19 नोव्हेंबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘विवाह तस्मे’ या बोर्डाचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार मॅनेजर महेश मनुरे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित पुरुषांचे शाल, श्रीफळ व चंदूकाका सराफ ज्वेलर्सतर्फे गिफ्ट देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती कुंभार सर आणि शिवकुमार रुबे यांनी दिली.
मनोगत व्यक्त करताना अनिल चव्हाण म्हणाले, “1827 साली बारामती येथे झालेल्या स्थापनेपासून चंदूकाका सराफ ज्वेलर्सने शुद्धता, पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचा वारसा जपला आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्र व कर्नाटकात ग्राहकांची पहिली पसंती ठरले आहेत.”
कार्यक्रमाला सोलापूर विकास मंचचे आनंद पाटील, पो.स.ई. नागेश फुटाणे, माणिक गोसावी, रामचंद्र पवार, सिद्धाराम चव्हाण, वसंत जाधव, विकास वाळके, श्याम म्हेत्रे, बंडगर, मनोज काळे, सोहम मुलमाने, विष्णू ताकमोगे, मृदुल वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार रुबे यांनी केले. आभार प्रदर्शन महेश महेंद्रकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर चहापान व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले.
What's Your Reaction?