जुळे सोलापुरात भजनी मंडळांचा दरवळला स्मृतीगंध

विजेत्या चार महिला भजनी मंडळांना रोख पारितोषिके

Jun 17, 2026 - 00:31
 0  3
जुळे सोलापुरात भजनी मंडळांचा दरवळला स्मृतीगंध
भजन स्पर्धेत विजेता संघ समर्थ भजनी मंडळ आसरा नगर

सोलापूर : जुळे सोलापुरातील गोविंद श्री मंगल कार्यालयात महिला भजनी मंडळांनी स्मृतीगंधच्या माध्यमातून भजन गुरू उर्मिला सुमंत यांना आगळी वेगळी श्रध्दांजली वाहिली. रेणुका भजनी मंडळाचे मार्गदर्शक शोभा देशपांडे, माजी अध्यक्षा नमिता थिटे, शाकुंतल भजनी मंडळाच्या अध्यक्षा मनिषा पाटील यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.  यामध्ये 10 भजनी मंडळांनी  सहभाग घेतला होता.
   या कार्यक्रमास माजी महापौर  नलिनी चंदेले, गोविंदश्रीच्या रेखा शिवलिंग कांबळे, अ‍ॅड मानसी कुलकर्णी, गायिका सुजाता देशपांडे, शोभा देशपांडे, नमिता थिटे, मनिषा पाटील तसेच उर्मिला सुमंत यांच्या कन्या गिरीजा सुमंत उपस्थित होत्या. प्रास्ताविक शोभा देशपांडे, परिचय नमिता थिटे यांनी करून दिला.  
   भजन स्पर्धेत स्पर्धकासाठी १०मिनिटे वेळ दिला. त्यात एक गणपती व १ गुरूचे भजन सादर करायचे होते. स्पर्धेसाठी परीक्षक संगीत विशारद गायिका सुजाता देशपांडे होत्या. प्रथम क्रमांक: समर्थ भजनी मंडळ, द्वितीय क्रमांक: चिंतामणी भजनी मंडळ, तृतीय क्रमांक: रूक्मिणी भजनी मंडळ आणि  उत्तेजनार्थ अष्टभुजा भजनी मंडळ हे विजेते ठरले. या सर्व विजेत्यांना माजी महापौर नलिनी चंदेले व रेखा शिवलिंग कांबळे यांच्या हस्ते शाल, बुके, ट्रॉफी व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.  
   कार्यक्रम यशस्वीतेसाठी शोभा देशपांडे नमिता थिटे मनिषा पाटील सुनंदा गोखले, येमुलवार, अनिता कुलकर्णी, रेखा पाटील, किरण उपळाईकर, प्रतिभा सरदेशमुख, संध्या मळेकर, विजयालक्ष्मी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow