...तर विमानाचे तिकीट दर निम्याने कमी होतील!

चाय पे चर्चेत सोलापूर विमानतळ उड्डाण योजने अंतर्गत सुरू करण्याची मागणी

Apr 11, 2026 - 00:17
 0  33
...तर विमानाचे तिकीट दर निम्याने कमी होतील!

सोलापूर : महाराष्ट्र चेंबरच्या वतीने आयोजित बैठकीत सोलापूरच्या औद्योगिक आणि व्यावसायिक विकासासंदर्भात चाय पे चर्चा पार पडली. यावेळी सोलापूर विमानतळ उड्डाण योजने अंतर्गत सुरू केल्यास विमानाचे तिकीट दर निम्म्याने कमी होतील. त्यासाठी मुख्यमंत्री, खासदार व पालकमंत्री यांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन उपस्थित उद्योजकांनी केले.
     या बैठकीत फ्लाय 91 एअरलाईन्सचे बाघेश्‍वर यादव (जनरल मॅनेजर) यांनी मार्गदर्शन केले.  चाय पे चर्चा बैठकीत फ्लाय 91 एअरलाईन्स प्रतिनिधींनी सोलापूर ते गोवा आणि हैद्राबाद या विमानसेवांना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले. तसेच भविष्यात आणखी नवीन मार्ग सुरू करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले.  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन केतन शहा, उद्योजक संजीव पाटील, आयएमएच्या अध्यक्ष डॉ.मंजुषा शहा, डॉ मिलिंद शहा, चिंचोळी एमआयडीसीचे उपाध्यक्ष सुत्रावे, विकास मंचचे योगीन गुजर, विजय यादव, दत्ता अंबुरे, झाम्बरे व तिकीट एजन्ट्स, सोलापूर चेम्बरचे सचिव शहा, बच्चुवार, तरंग शहा, तसेच चादर, टॉवेल निर्यातदार व व्यापारी उपस्थित होते. या बैठकीमुळे सोलापूरच्या हवाई संपर्कात वाढ होण्यास चालना मिळणार आहे.
    जर सोलापूर विमानतळ हे उड्डाण योजने अंतर्गत सुरू झाल्यास तिकीट दर निम्म्याने कमी होतील, याचा  उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. स्वागत संजीव पाटील, प्रास्ताविक केतन शहा, आभार तरंग शहा यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow