संशयित कत्तलखान्यातून २१ जनावरांची सुटका

विजापूर वेशीत शनिवारी पहाटे पोलीस आणि विहिंप बजरंग दल गोरक्षक यांची धडक कारवाई

Jun 20, 2026 - 16:34
 0  59
संशयित कत्तलखान्यातून २१ जनावरांची सुटका

सोलापूर | सोलापूर शहरातील विजापूर वेस परिसरात शनिवारी २०रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस, विहिंप बजरंग दल गोरक्षक यांच्या संयुक्त कारवाईमध्ये २१ मुक्या जनावरांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. 

   या कारवाईमध्ये ७ जर्सी गायी आणि १४ म्हशी अशा एकूण २१ जनावरांना वाचविण्यात आले. सदर कारवाई ही संशयित कत्तलखाना ठिकाणी करण्यात आली असून, घटनास्थळावरून काही धारदार शस्त्रे व इतर संशयास्पद साहित्य आढळून आल्याची पोलिसांकडे प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. ही धडक कारवाई DCP श्री. प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोलापूर पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडण्यात आली.

   मुक्या जनावरांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या या संवेदनशील आणि प्रशंसनीय कार्याबद्दल विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गोरक्षक तसेच मानद पशु कल्याण समिती, सोलापूर जिल्हा यांच्या वतीने DCP यावलकर व संपूर्ण पोलीस टीमचे अभिनंदन करण्यात येत आहेत. सदर कारवाई गुप्त माहितीनुसार करण्यात आली. यामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गोरक्षक, मानद पशु कल्याण समिती अधिकारी – सोलापूर जिल्हा महेश भंडारी, विहिंप, बजरंग दल, गोरक्षक, मानद पशु कल्याण समिती अधिकारी सिद्धाराम चरकुपल्ली, गोरक्षक योगेश जडगोनार तसेच पोलीस प्रशासनाच्या तत्पर मदतीमुळे यशस्वीपणे पार पडली.

 प्राथमिक माहितीनुसार काही व्यक्तींवर संशय व्यक्त करण्यात येत असून, संबंधित यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यान्वर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये संशयित पुढीलप्रमाणे: १) मुद्दो कासीम कुरेशी,२) इम्तियाज कुरेशी, ३)इजार कय्युम कुरेशी, ४) इसाम काशिम कुरेशी. तसेच संबंधित विरोधात यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्यास त्याचीही चौकशी करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल गोरक्षक, सोलापूर मानद पशु कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow