अरे बाप रे ! IAS पूजा खेडकर वडिलांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख, तरीही नॉन क्रिमिलेअर

खेडकरांच्या कारने वाहतुकीचे तब्बल २१ नियम मोडले, २७ हजारांची दंडवसुली थकित

Jul 12, 2024 - 06:47
Jul 12, 2024 - 06:48
 0  55
अरे बाप रे !  IAS पूजा खेडकर वडिलांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख, तरीही नॉन क्रिमिलेअर
IAS पूजा खेडकर

लोकसभेच्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात जमीन 110 एकर, 7 फ्लॅट्स दाखवले आहे. त्यापैकी एक पवई हिरानंदानीमध्ये आहे. 1 लाख 60 हजार स्केअर फूटची 6 दुकाने आहेत. दुसरीकडे 8 लाखांच्या आत उत्पन्न दाखवून नॉन क्रिमिलेअर मिळवले.पुणे येथील प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी डॉ. पूजा खेडकर अचानक चर्चेत आल्या. बदली झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या. पूजा खेडकर यांनी प्रबोशनमध्ये असताना विशेष अधिकारांची मागणी केली. त्यात लाल दिव्याची गाडी, व्हीआयपी नंबर प्लेट, खासगी ऑडी कारवर लावलेला महाराष्ट्र सरकारचा बोर्ड, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी या सर्व प्रकारामुळे पूजा खेडकर प्रसिद्धीस आल्या. IAS पूजा खेडकर कुटुंबियांकडे 110 एकर जमीन, 7 फ्लॅट्स, 1 लाख स्केअर फुटाची 6 दुकाने आहेत. पूजा खेडकर यांच्या नावावर देखील 17 कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या वडिलांनी निवडणूक शपथपत्रात 40 कोटींची संपत्ती दाखवली. त्यानंतर पूजा यांनी नॉन क्रिमिलेअर ओबीसींमधून काढले होते. हा सर्व प्रकार अचंबित करणार आहे.


वार्षिक उत्पन्न ४९ लाख, तरीही क्रिमिलेअर
नॉन क्रिमिलेअर मिळण्यासाठी आई- वडीलांचे कुटुंबाचे उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असावे लागते. परंतु पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी वडिलांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी त्यांची संपत्ती ४० कोटी दाखवली. त्यांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख आहे. नॉन क्रिमीलीयरची मर्यादा ८ लाखांची आहे. मग त्यांचे वडिलांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख असताना त्यांना कसा फायदा मिळाला? हा प्रश्न आहे.  दिलीप खेडकर हे प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी होते.

बेहिशोबी मालमत्तेचा आरोप
लोकसभेच्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात जमीन 110 एकर, 7 फ्लॅट्स दाखवले आहे. त्यापैकी एक पवई हिरानंदानीमध्ये आहे. 1 लाख 60 हजार स्केअर फूटची 6 दुकाने आहेत. दुसरीकडे 8 लाखांच्या आत उत्पन्न दाखवून नॉन क्रिमिलेअर मिळवले. यातून हे स्पष्ट आहे त्यांच्याकडील ही बेहिशोबी मालमत्ता आहे. या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली.
सरकारी नोकरीतून एवढी संपत्ती मिळवणे कधीच होत नाही. हे जगाला माहीत आहे. पूजा खेडकर यांच्या नावावर देखील 17 कोटींची संपत्ती आहे. एवढं सर्व संपत्ती कमावण्यासाठी दुसरे व्यवसाय लागतात. तसेच पूजा यांची कंपनीसुद्धा आहे. सरकारी नोकरीत असताना कंपनी स्थापन करता येत नाही, असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.

पूजा खेडेकर यांच्या गाडीला दंड
पूजा खेडकर प्रकरणात पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. पूजा खेडकर यांच्या गाडीवर पुणे पोलिसांनी 21 हजार रुपयांचा दंड लावला आहे. बेकायदेशीर रित्या गाडीला दिवा बसवल्याने हा दंड लावला आहे. तसेच या प्रकरणाची पुणे पोलीस चौकशी करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुण्यात वास्तव्यास असताना पूजा खेडकर ज्या ऑडी कारचा वापर करत होत्या त्या कारवर अनेक दंड (चालान) ठोठावण्यात आले आहेत. पूजा खेडकर वापरत असलेली कार त्यांच्या खासगी अभियांत्रिकी कंपनीच्या नावाने नोंदणीकृत असल्याचं पोलीस तपासांत निष्पन्न झालं आहे. या कारवर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी २१ तक्रारींची नोंद आहे. तसेच या कारवर २७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, जो अद्याप वसूल केलेला नाही. कारण पुणे पोलिसांनी अद्याप त्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow