सद्गुरू औसेकर महाराज परिवारास मातृ:शोक
श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज यांना देवाज्ञा
लातूर : श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औसाचे ४ थे पिठाधीपती सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या धर्मपत्नी आणि विद्यमान पीठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर आणि पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांना हैदराबाद येथे त्यांच्या आशीर्वाद निवासस्थानी शनिवार दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ७.५० वाजता देवाज्ञा झाली.
रविवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता औसा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
श्रीमती लिलाबाई आईसाहेब यांच्या पश्चात श्री गोरखनाथ महाराज, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष श्री सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री बसवंतराव देशमुख चिटगोपा हे तीन सुपुत्र, सुना, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे. आईसाहेबांच्या जाण्याने औसेकर संस्थान महाराज परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच औसा संस्थानचे लाखो शिष्य, भक्त गण शोकसागरात बुडाला आहे.
लक्ष्यवेध न्यूज परिवारचे वतीने स्व.आईसाहेब लिलाबाई यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली
What's Your Reaction?