औषध निरीक्षक पद भरतीची जाहिरात अन् थेट एमपीएससी अधिकार्‍यांना बेड्या..

पेपर लीक घोटाळ्याचा असा हा प्रवास..

Aug 27, 2026 - 12:48
 0  132
औषध निरीक्षक पद भरतीची जाहिरात अन् थेट एमपीएससी अधिकार्‍यांना बेड्या..

(विजयकुमार पिसे)

   मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत पेपरफुटीच्या घोटाळ्यात अधिकारीच मास्टर माईंड निघाले आहेत. पोरीसाठी फोडलेला पेपर पाहता महाराष्ट्रातही परीक्षा व्यवस्था किती पोखरली गेली या संताजपनक प्रकरणाचा घटनाक्रम पहा कसा आहे...

 जुलै 2025 मध्ये भरतीची जाहिरात. मार्च 2026 : पेपर फुटला, ऑगस्ट 2026 :भरती प्रक्रियाच रद्द. आणि त्यानंतर थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अवर सचिवांसह जणांना बेड्या.

29 जुलै 2025: एमपीएससी अन्न व औषध प्रशासन विभागात औषध निरीक्षक पद भरतीची जाहिरात.

22 मार्च 2026: औषध निरीक्षक पदासाठीची ऑफ लाईन पद्धतीने चाळणी परीक्षा.

12 जून 2026: परीक्षेचा निकाल जाहीर. त्याआधारे 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र.

1 ते 22 जुलै 2026: पात्र उमेदवारांच्या मुलाखती. 506 पैकी 488 उमेदवारांची मुलाखतीस हजेरी.

21 जुलै 2026: मुलाखती सुरू असतानाच, पेपर फुटीची पहिली लेखी तक्रार एमपीएससीला प्राप्त.

22 जुलै 2026: मुलाखत प्रक्रियेनंतर आयोगाकडून 488 उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर. 3 उमेदवार अपात्र.

22 ते 26 जुलै 2026: या दरम्यान आयोगाकडे तक्रारींचा पाढा. परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजेच 20 मार्च रोजीच प्रश्‍नपत्रिका डिजिटल माध्यमांवर लीक झाल्याचा आरोप.

27 जुलै 2026: तक्रारींचे गांभीर्य पाहता, एमपीएससीकडून चौकशीसाठी मुंबई पोलिसांना पाचारण.

जुलै अखेर: प्राथमिक चौकशीअंती एका उमेदवाराला परीक्षेच्या आधीच प्रश्‍नसंच मिळाला अशी माहिती. *ऑगस्ट 2026: भरती रद्द आणि मोठी कारवाई

25 ऑगस्ट 2026: परीक्षेची गोपनीयता, पारदर्शकता आणि उमेदवारांचा विश्‍वास कायम ठेवण्यासाठी एमपीएससीने औषध निरीक्षक गट पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्दची घोषणा.

26 ऑगस्ट 2026: मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह 6 जणांना अटक. अटकेतील संशयित आरोपी : 

1) विश्‍वेश्‍वर दत्तात्रय नकाते (सहा.कक्ष अधिकारी, एमपीएससी) 2) अभिजीत गणपतराव लेंडवे (अवर सचिव, एमपीएससी) 3) गोपाळ मराठे (सहाय्यक कक्ष अधिकारी, एमपीएससी) 4) प्रविण दिलीप पाटील (संचालक, कौटील्य अकादमी, नंदुरबार) 5) अमृत नामदेव पाटील 6) लोकेश उर्फ गौरव राजेंद्र पाटील.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow