Gen-Z चा आविष्कार, श्रावणानिमित्त विहिंपच्या कावड यात्रेत युवकांचा सहभाग!
कावड यात्रा: Gen-Z चा श्रद्धा, संघटन आणि परंपरेला प्राधान्य. युवकांच्या एकजुटीतून गावाला नवी दिशा देऊ या! हर हर महादेव, जय श्रीराम!
सोलापूर : आजची Gen-Z म्हणजे फक्त मोबाईल, सोशल मीडिया आणि आधुनिक जीवनशैली नाही... तर हीच Gen-Z आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि श्रद्धेशी जोडलेलीही आहे, हे दाखवून देणारी प्रेरणादायी कावड यात्रा भक्तिभावाने संपन्न झाली. निमित्त होते विश्व हिंदू परिषदेच्या वतीने श्रावणात परंपरेने होणारी कावड यात्रा!
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल संगम (जिथे भीमा आणि सीना नदीचा संगम होतो) येथून पवित्र जल आणून आपल्या ग्रामदैवताच्या शिवलिंगाच्या चरणी अर्पण करणारा जलाभिषेक सो़हळा. हा उपक्रम दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सिंदखेड, राजूर, संजवाड आणि सोलापूर शहरातील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या तरुण कार्यक़र्त्यांनी एकत्र येऊन पार पाडला. याचबरोबर 'संगठन मे शक्ती है!' याची प्रचिती दिली. या कावड यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यात सहभागी झालेले युवक वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करणारे आणि आपल्या आयुष्यात सर्वार्थाने तसेच स्वकर्तृत्वाने स्थिर झालेले आहेत. कोणी उद्योजक, कुणी आयटी क्षेत्रात तज्ञ, कुणी विद्यार्थी, कुणी प्राध्यापक, कुणी पोलीस सेवेत, तर कुणी सराफी व्यवसायामध्ये आपला ठसा उमटवला आहे. म्हणजेच करिअर, व्यवसाय आणि आधुनिक जीवनात व्यस्त असलेली जेन झी Gen-Z पिढी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आपल्या सनातन परंपरेचे जागरणासाठी एकत्र आली.
एक कावड यात्रा हत्तरसंग कुडल संगम ते राजूर, दुसरी कावड यात्रा हत्तरसंग कुडल संगम ते संजवाड. या दोन मार्गांनी निघाली. भीमा,सीना संगमातील पवित्र जल कावडीने गावात आणण्यात आले. गावात कावड पोहोचल्यानंतर ग्रामदैवताचा विधिवत जलाभिषेक, पूजा-अर्चा हा धार्मिक उपक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. याप्रसंगी दक्षिण सोलापूरचे प्रखंड सहमंत्री अजय गवसने (सिंदखेड) शिवानंद गडदे, अभिजीत बिराजदार, मल्लिनाथ पाटील व बजरंग दल युवकांनी पुढाकार घेतला.
ही केवळ कावड यात्रा नाही, ही एका नव्या विचाराची सुरुवात आहे. आम्ही Gen-Z आहोत, आम्ही आधुनिक आहोत; पण आमच्या मुळांशी, परंपरेशी जोडलेले आहोत. ही पिढी करिअर करेल, व्यवसाय उभे करेल, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाईल, समाजात आपले स्थान निर्माण करेल. पण त्याचवेळी आपली संस्कृती, परंपरा आणि श्रद्धाही पुढे घेऊन जाईल. ती जपण्याचा प्रयत्न करेल. तसेच आजचे वातावरण प्रदूषित करणारे तथाकथित घटक दूर सारून समाज जागरणही करेल. आजच्या या उपक्रमातून गावातील युवकांनी एक संदेश दिला आहे, आधुनिकता स्वीकारूया, पण संस्कृती विसरू नका. प्रगती करूया, पण मुळांशी नातं तोडू नका. आणि स्वतःच्या यशासोबत समाजासाठीही काहीतरी करूया!
आज आपल्या गावातून सुरू झालेली ही परंपरा उद्या इतर गावांसाठीही प्रेरणा ठरावी, आणि पुढील वर्षी महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये युवकांच्या सहभागातून अशाच कावड यात्रांची सुरुवात व्हावी, हीच भावना.
Gen-Z फक्त ट्रेंड फॉलो करत नाही... कधी कधी Gen-Z स्वतःच आपली परंपरा देखील राखतो!
चला श्रद्धा जपूया, परंपरा पुढे नेऊया, आणि युवकांच्या एकजुटीतून गावाला नवी दिशा देऊया! हर हर महादेव, जय श्रीराम!
या कावड यात्रेत शिवराज गडदे, यल्लालिंग गडदे,महेश चिन्हेकर, नागनाथ वाघमारे, परसप्पा मेणसे, परशुराम वाघमारे, कुमार माशाळे (राजूर). अभिषेक बिराजदार, गंगाधर बिराजदार,ओंकार बिराजदार, सोमशंकर बुळगुंडे, रतीकांत बिराजदार, संतोष पाटील (संजवाड), मल्लिनाथ पाटील, आनंद सिंदगी, गौरव घम, अजय वेदपाठक (सोलापूर) हे युवक दक्षिण सोलापूरचे प्रखंड सहमंत्री अजय गवसने (सिंदखेड) यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते. विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री विजयकुमार पिसे, सहमंत्री संजयकुमार जमादार (कुंभारी), जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे, बजरंग दल संयोजक अभय कुलथे आणि धर्मप्रसार आयामचे रवी बोल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावणानिमित्त ही कावड यात्रा यशस्वीपणे पार पडली.
जय श्रीराम..
What's Your Reaction?