मोदींच्या प्रशासकीय सुशासनाचा रौप्य महोत्सव
सलग 25 वर्षं ध्वजारोहणाचा मान, विकसित भारताचा रोडमॅप, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा नवा इतिहास
(विजयकुमार पिसे)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सलग १३ वेळा तिरंगा फडकवला. तर प्रशा/शासनप्रमुख ध्वजारोणाचा यंदा रौप्य महोत्सव आहे. सलग २५ वेळा ध्वजारोहण करण्याचा नवा विक्रम नरेंद्र मोदी यांनी प्रस्थापित केला आहे.
गुजरातच्या (१२वर्ष) मुख्यमंत्रिपदापासून पंतप्रधानपदापर्यंतच्या (१३ वर्ष) प्रवासात त्यांनी स्वातंत्र्यदिनाला जनउत्सवाचे स्वरूप प्राप्त करून दिले, ही विशेषत: आहे. आता त्यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य मांडले आहे. प्रधानमंत्री मोदींचा विक्रम आणि संकल्प अभिनंदनीय असून लक्ष्यवेध परिवाराचे वतीने त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा...
शासनप्रमुख म्हणून सलग २५ वेळा तिरंगा फडकवण्याचा नवा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी आपल्या नावावर केला आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मोदी आता 'सप्तधारा'च्या माध्यमातून झेप घेण्याच्या तयारीत आहेत. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तरुण अर्थात Gen-Z, शेतकरी आणि महिलांकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. याच Gen-Z साठी लाल किल्ल्यावरून त्यांनी मोफत ऑनलाइन कोचिंगपासून AI ट्रेनिंग पर्यंतच्या घोषणाही आज केल्या.
मोदी यांनी पीएम म्हणून १३वेळा तिरंगा फडकावला. यासोबतच शासन व प्रशासन प्रमुख म्हणून सलग २५ वेळा ध्वजारोहणाचा नवा विक्रम त्यांच्या नावावर झाला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी १२ वेळा व देशाचे पंतप्रधान म्हणून आज १३व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला. केवळ मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा सर्वाधिक काळ प्रशासनाच्या शीर्षस्थानी राहण्याचा विक्रमच नव्हे, तर सर्वाधिक वेळा राष्ट्रध्वज फडकावण्याचा विक्रमही त्यांनी देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केला, याचा अभिमान आहे.
राष्ट्रध्वज फडकावण्याच्या बाबतीत रौप्यमहोत्सव साजरा करणारे नरेंद्र मोदी पुढील दोन महिन्यांत आपल्या प्रशासकीय कारकिर्दीचाही रौप्यमहोत्सव साजरा करतील. ७ ऑक्टोबर रोजी प्रशासनाच्या शीर्षस्थानी त्यांना २५वर्षे पूर्ण होतील. ७ ऑक्टोबर २००१ रोजी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनलेले मोदी जनसमर्थनामुळे मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशी आपली प्रशासकीय वाटचाल अखंडपणे सुरू ठेवली आहे.
स्वातंत्र्यदिन म्हणजे जनउत्सवच
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचा विचार केला तर मोदी यांनी गेल्या २५ वर्षांत हा कार्यक्रम केवळ सरकारी कार्यक्रम न ठेवता त्यास जनउत्सवाचे स्वरूप दिले आहे. याशिवाय संकल्प आणि सिध्दी, अर्थात रिपोर्ट कार्ड सादर करतात. लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी जनतेला आपला हिशोब देणे आणि शासनाची दिशा व उद्दिष्टे निश्चित करणे यासाठी स्वातंत्र्यदिन सोहळा ही मोठी उपलब्धी या प्रवासातून लक्षात येईल.
७ ऑक्टोबर २००२रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारलेल्या मोदींना शासनप्रमुख म्हणून पहिल्यांदा १५ऑगस्ट २००२ रोजी राष्ट्रध्वज फडकावण्याची संधी मिळाली. तो काळ मोदींसाठी आव्हानांचा होता. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा घटनेत ५९ कारसेवकांना जाळून मारण्यात आल्याच्या घटनेनंतर गुजरातेत दंगली उसळल्या. विरोधक आक्रमक झाले होते. त्यामुळे मोदी यांनी जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेत १९ जुलै २००२ रोजी गुजरात विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली. तसेच लवकर निवडणुका घेण्याची मागणी केली. मात्र तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त जेम्स मायकेल लिंगडोह यांनी गुजरातमध्ये लवकर निवडणुका घेण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत राज्याचे कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून मोदी यांनी ऑगस्ट २००२ मध्ये पहिल्यांदा ध्वजारोहण केले.
पुढे मोदी यांनी सुशासनावर भर देत म.गांधी आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळवलेल्या भारतात सुराज्यनंतर सुशासनही तितकेच महत्त्वाचे आहे, असे आग्रहाने मांडले. त्यांच्या कारभाराचा हाच मूलमंत्र ठरला. हा मूलमंत्र म्हणजे गुजरात मॉडेल विकसित झाले. देशभरात त्याची चर्चा झाली. जनतेच्या मनात स्थान निर्माण झाले आणि मे २०१४ मध्ये मोदी देशाचे पंतप्रधान झाले. ते सलग १३ वर्षे या पदावर आहेत.
२०४७ विकसित भारताचे लक्ष्य
पंतप्रधान म्हणून १३व्यांदा लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी शक्तीची 'सप्तधारा' प्रवाहित करण्याची भूमिका मांडली. १४०कोटी देशवासीयांच्या सामूहिक शक्तीच्या माध्यमातून हे स्वप्न वास्तवात बदलण्याचा संकल्प आहे. यामध्ये समस्त देशवासियांनीही मोदी यांना वज्रमूठ साथ देऊ या!
वंदे मातरम ????
What's Your Reaction?