अजातशत्रू राजकीय नेते गुरूचरणी लीन! होटगी बृहन्मठात हर हर महादेवचा जयघोष..

श्रावणमास निमित्त भस्मारती, गंगा महाआरती; मंगलध्वनीसह शिवनाम, हर हर महादेवचा जयकार, शेकडो भक्तांची उपस्थिती

Sep 8, 2026 - 11:38
Sep 8, 2026 - 13:31
 0  85
अजातशत्रू राजकीय नेते गुरूचरणी लीन!  होटगी बृहन्मठात हर हर महादेवचा जयघोष..

 (विजयकुमार पिसे)
राजकारणात राहूनही अजातशत्रू ही अनुभूती सोमवारी श्री होटगी बृहन्मठात अनेक उपस्थित भक्त, चाहत्यांनाही आली. श्रावण मासानिमित्त येथे काशी पीठाचे जगद्गुरू डॉ.मल्लिकार्जुन विश्‍वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांचे तपोनुष्ठान सुरू आहे. भाजपाचे आ. सुभाष देशमुख, आ.विजय देशमुख, आ.सचिन कल्याणशेट्टी, सेनेच्या खा.ज्योती वाघमारे, डनगरसेवक डॉ.किरण देशमुख हे अजातशत्रू नेते आज पहाटेपासून मठात उपस्थित राहून गुरूचरणी लीन होते. 


   श्रावणात दररोज पहाटेपासूनच या मठात ष धार्मिक विधी सुरू असतात. आजच्या या विधीसाठी आ.सचिन कल्याणशेट्टी व डॉ. किरण देशमुख सपत्नीक आवर्जून उपस्थित होते. वरील सर्व नेते मंडळी भाविक भक्त आणि विश्‍व हिंदू परिषदेचे विभागमंत्री विजयकुमार पिसे व अकरा सपत्नीक यजमान यांच्या हस्ते धार्मिक विधी, षोडशोपचार पूजन झाले. नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते गंगा महाआरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. पूज्य जगद्गुरूंनी सर्व भाविक भक्त यांना पावन आशीर्वाद देऊन मंगलकामना केली.
   तत्पूर्वी मठाचे मुख्य पुरोहित परमेश्‍वर शास्त्री यांच्या हस्ते स्थापित भव्य शिवलिंगास भस्मारती पार पडली. मठाधिपती चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य स्वामी यांनी शिवलिंग आणि जगद्गुरू यांना प्रणाम करून गंगाआरती केली. याप्रसंगी सेनेचे नगरसेवक प्रियदर्शन साठे, धनेश अचलारे, उद्योजक महादेव कोगनुरे, मठाचे ट्रस्टी नगरसेवक शिवानंद पाटील, मठाचे सचिव शांतय्या स्वामी, दै.तरुण भारतचे विश्‍वस्त दिलीप दुलंगे, प्रगतीशील शेतकरी गुंडू अण्णा पाटील, उद्योजक मल्लिकार्जुन पाटील, हरिश पाटील, सुवर्ण स्पोर्टस अकॅडमीचे संचालक चन्नेश इंडी, भाजपा उपाध्यक्ष सोमनाथ केंगनाळकर, सचिव मनोज कलशेट्टी, अभिषेक पाटील (होटगी) या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
अत्यंत भक्तिमय वातावरणात श्रावण मासानिमित्त पूजेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक व भक्त मंडळी पूजा व दर्शनासाठी उपस्थित होते. आज दुग्धशर्करा योग आला, अशी प्रतिक्रिया मनोज कलशेट्टी यांची होती.
  अजातशत्रू राहण्याचे कौशल्य बहुतेक राजकीय नेत्यांना असते. राजकारण  आणि सत्तास्थान प्रभावित करतात. तो प्रभाव आज दिसून आला. एरवी नेत्यांमधील कटुताच्या बातम्या झळकावल्या जातात. परंतु तसा कोणताही अभिनिवेश नव्हता. गेल्या आठवड्यात केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रा. अशोक निन्बर्गी, सेनेचे नगरसेवक अमोल शिंदे या धार्मिक विधीसाठी उपस्थित होते. अनेक नेत्यांचे नेहमीच श्री होटगी बृहन्मठात आगमन, दर्शन आणि पूजन होते.
श्रावण मासाच्या यापुढील काळात आणखी काही अजातशत्रू नेतेमंडळींची गंगा महाआरतीस उपस्थिती अपेक्षित मानली जाते. त्यांच्या आगमनाची उत्सुकता आहेच. सत्तास्थानी धर्मदंड स्थापित असतो. तो शासकावर नियंत्रण करतो. ही प्राचीन परंपरा. ती आजही अबाधित असून श्री होटगी बृहन्मठात याची प्रचिती अलीकडच्या काळात अनेकदा आली आहे. त्यामुळे अनेक मान्यवर मंडळी श्री होटगी बृहन्मठामध्ये आवर्जून येतात. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow