पुणे शिक्षक, पदवीधर निवडणूक: भाजप आ. देशमुख, आ.कल्याणशेट्टी, डॉ. शैलेश पाटील यांचा झंझावाती प्रचार संपर्क व गाठीभेटी

पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी सोलापुरात भाजप नेत्यांनी जनसंपर्क मोहीम तीव्र केली आहे. आमदार विजय देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ. शैलेश पाटील शेळगीकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक, पदवीधर, प्राध्यापक, शैक्षणिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी भेटीगाठी घेण्यात आल्या. दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत प्रचाराला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Oct 19, 2026 - 13:28
Oct 19, 2026 - 16:09
 0  181
पुणे शिक्षक, पदवीधर निवडणूक: भाजप आ. देशमुख, आ.कल्याणशेट्टी, डॉ. शैलेश पाटील यांचा झंझावाती प्रचार संपर्क व गाठीभेटी

(विजयकुमार पिसे)
सोलापूर : पुणे शिक्षक व पदवीधरचे भाजपा उमेदवार कौस्तुभ गावडे व स्मिता जाधव यांच्या प्रचारार्थ आ.विजय देशमुख तसेच आ.सचिन कल्याणशेट्टी, डॉ. शैलेश पाटील यांनी झंझावाती प्रचार संपर्क व गाठीभेटीने वातावरण ढवळून निघाले आहे.
    भाजपाचे प्रमुख नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते  शिक्षक व पदवीधरांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतल्या. संपर्क केला.  यावेळी दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे त्यांनी आवाहनही केले. आ. देशमुख यांचे मतदारांनी आपुलकीने केलेले स्वागत, चहापान आणि मनमोकळ्या चर्चांमुळे प्रचार दौर्‍याला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी राजशेखर हिरेहब्बू, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक प्रविण दर्गोपाटील, बिपीन धुम्मा, प्रसाद कुलकर्णी, बसवराज अंकुशे, योगीराज भोगडे, ओंकार भोगडे, राजेंद्र नाशिककर, शशांक खुणे, सिद्धाराम भैरुपाटील, चंद्रकांत वाकडे, तम्मा कल्याणशेट्टी, अरविंद झगडे, अभिषेक मेंगाणे उपस्थित होते.- 

    भाजप पश्‍चिम महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ. शैलेश पाटील शेळगीकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच दिवसांपासून विविध शैक्षणिक संस्था, प्राध्यापक, शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी संपर्क साधण्यात येत आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. लक्ष्मीकांत दामा, शिवदारे कॉलेजचे प्राचार्य एम. एस. कलशेट्टी, व्ही. जी. शिवदारे आर्ट्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य जी. के. कापसे आणि प्राचार्य ए. बी. वळसंगे यांच्यासह विविध मान्यवरांशी संपर्क व संवाद साधला.  उमेदवारांचे प्रतिनिधी अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, डॉ. अमोल पाटील, डॉ. मुकेश अग्रवाल, राम डोके यांची प्रमुख उपस्थितीत आहे.
    या संपूर्ण प्रचार मोहिमेची तसेच विविध शैक्षणिक संस्थांमधील मान्यवरांसोबत झालेल्या भेटीगाठींची माहिती आ. सचिन दादा कल्याणशेट्टी यांना देण्यात आली. यावेळी सचिन कुलकर्णी, उमेश कोळेकर, धरिराज रमणशेट्टी आणि सचिन विभुते यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या प्रचार दौर्‍यात उमेदवार प्रतिनिधी डॉ. अमोल पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. जे. एस. भावळकर, डॉ. राम डोके आणि डॉ. मुकेश अग्रवाल यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
   तसेच श्री सिद्धेश्‍वर वुमेन्स पॉलीटेक्निकचे प्राचार्य गजानन धरणे, प्राचार्य तुकाराम चव्हाण, वालचंद इंजिनिअरिंगचे प्राचार्य संतोष कोटी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्याही भेटी घेतल्या.  डॉ. शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या जनसंपर्क मोहिमेतून प्रचाराला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow