सोलापूर जनता सह.बँक़ निवडणूक़,परिवार पॅनलला करा मतदान
गत चार वर्षात बँकेला 100 कोटींचा नफा : अध्यक्ष सुनील पेंडसे 17 पैकी 7 जागा यापूर्वीच बिनविरोध: अॅड.मिलींद कुलकर्णी, ग्राहकांना लवकरच यूपीआय सेवाप्रणाली, 4नव्या शाखा उघडण्याचा मानस : पेंडसे,भुतडा
(विजयकुमार पिसे)
सहकार क्षेत्रामधील प्रथितयश बँक सोलापूर जनता सह.बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवार पॅनललाच मतदान करा,असे आवाहन सर्व स्तरातील अनेक मान्यवरांनी केले आहे. परिवार पॅनलचे निवडणूक चिन्ह कीटली आहे. त्यावर फुलीचा शिक्का मारून बहुमताने निवडून द्यावे असे सर्व सभासदांना लक्ष्यवेध न्यूज परिवारचे वतीने नम्रपणे आवाहन आहे.
17 जागांसाठी निवडणूक़ प्रक्रिया सुरू असून सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी 17मार्च रोजी स.8 ते सायं. 4 पर्यंत मतदान होत आहे. बँकेचे विद्यमान संचालक पुरुषोत्तम उडता (टॉवेल कारखानदार),सीए आनंद करवंदे,मार्केट यार्डातील व्यापारी आणि भुसार आडत व्यापारी असो.अध्यक्ष सुरेश चिक्कळी,सामाजिक कार्यकर्ते महादेव न्हावकर,व्ही.आर.साडी शोरूमचे प्रमुख संचालक राजेश पवार,उदयोजक तथा बॐकेचे विद्यमान अध्यक्ष सुनील पेंडसे, सीए गिरीश बोरगावकर,उद्योजक प्रमोद भुतडा,मोंढे अॅटोमोबाईल्स प्रमुख संचालक विष्णू मोंढे आणि अॅड. मल्लिनाथ शहाबादे ही मान्यवर मंडळी परिवार पॅनलचे उमेदवार आहेत.
दरम्यान सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सत्ताधारी परिवार पॅनलमधील विद्यमान संचालकांच्या प्रयत्नांमुळे गेल्या चार वर्षांमध्ये बँकेला 100 कोटींहून अधिक नफा मिळाला आहे, अशी माहिती बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुनील पेंडसे आणि परिवार पॅनलचे सहनिवडणूक प्रमुख जगदीश भुतडा यांनी दिली.
श्री.पेंडसे म्हणाले, मार्च 2021 मध्ये बँकेला 11.86 कोटींचा तोटा होता. गेल्या पाच वर्षांमध्ये हा तोटा भरून काढून बँकेने 100 कोटीपयर्र्ंत नफा मिळवला आहे. एनपीए17.13टक्के वरून आता 0.32टक्के आहे. यंदाच्या मार्च अखेर बँकेचा नेट प्रॉफिट 25 ते 30 कोटी राहणार आहे. गत तीन वर्षे चढत्या क्रमाने सभासदांना लाभांशही दिला आहे. बँकेचा यूपीआय प्रणालीमध्ये समावेश होणार असून ग्राहकांना ही सेवा लवकरच उपलब्ध होईल.शिवाय चार नव्या शाखा उघडण्याचा मानस असल्याचे पेंडसे,जगदीश भुतडा यांनी सांगितले.
संचालकपदाच्या निवडणुकीत 17 पैकी 7 जागा बिनविरोध झाल्या असून परिवार पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास परिवार पॅनलचे निवडणूक प्रमुख अॅड. मिलिंद कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला. बँकेचे उपाध्यक्ष अॅड. मिलिंद कुलकर्णी, डॉ. हर्षल डंबळ, अमित आपटे, चरणसिंग चौहान, चंद्रिका चौहान, गौरी आमडेकर, रवींद्र साळे हे सात उमेदवार यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत.
What's Your Reaction?