शेतकर्‍यांचे हित, यासाठी सामान्य शेतकर्‍याचा मुलगा म्हणून मळेवाडी यांची लढाई

आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघात उमेश मळेवाडी यांच्या अ‍ॅटो रिक्षाने घेतली स्पीड! बाजार समितीसाठी रविवारी मतदान

Apr 26, 2025 - 01:28
Apr 26, 2025 - 01:28
 0  110
शेतकर्‍यांचे हित, यासाठी सामान्य शेतकर्‍याचा मुलगा म्हणून मळेवाडी यांची लढाई

सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी उद्या रविवारी 27 एप्रिल रोजी मतदान होत आहे. सत्ताधार्‍यांचेच दोन पॅनल समोर असले तरी अपक्ष उमेश सुरेश मळेवाडी (राजूर) यांच्या अ‍ॅटो रिक्षाने स्पीड घेतला आहे.  शेतकर्‍यांच्या हितासाठी शेतकर्‍याचा मुलगा मैदानात उतरला आहे. त्यामुळे मतदानाचा निकाल कसा लागेल याची उत्सुकता आहे.
  आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघात  तीनच उमेदवार आहेत. आ.कल्याणशेट्टी/माने पॅनलचे कळके आणि देशमुख/साठे पॅनलचे शहा आणि या दोघांच्या लढाईत छेद देण्यासाठी राजूरचे उमेश मळेवाडी यांचा सुप्त प्रचार लक्ष वेधून घेत आहे. राजूरचे माजी उपसरपंच तथा भाजपाचे जुने ज्येष्ठ नेते सुरेश मळेवाडी यांचे सुपुत्र उमेश यांनी अपक्ष म्हणून ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघात प्रचारादरम्यान रंगत आणली आहे. आघाडी घेतली आहे. ग्रामपंचायतीचे मतदार सदस्य, सरपंच, उपसरपंच, यांच्या वैयक्तिक भेटीगाठी, संपर्क, अन्य सहानुभूतदारांची मतदानासाठी जोडणी ही त्रिसूत्री प्रचार यंत्रणा फलदायी ठरली आहे. अनेक नेते व मतदार यांनी मळेवाडी यांना एक मत हमखास देणार, असा विश्‍वास दिला आहे. त्यामुळे उमेश मळेवाडी यांना विजयाची खात्री वाटते. 


  निवडणुकीतील दोन्ही पॅनल बाहुबली आणि प्रस्थापित नेत्यांची आहे.  त्यामानाने मळेवाडी यांची होम टू होम....प्रचार यंत्रणा. शेतकरी मतदारांच्या भेटी गाठी यांची सक्रियता वाढवली आहे. मळेवाडी यांचा परिवार, निष्ठावंत कार्यकर्ते भाजपाशीच निगडित आहेत. सुरेश मळेवाडी,  मूळचे भाजपाचेच आहेत. बहुतांश निवडणुकीत त्यांना डावलले गेले, बाजार समिती निवडणुकीत  पक्षाने शेतकर्‍यांचा मुलगा म्हणून लक्ष ठेवा, हे अपेक्षित होते. मळेवाडी परिवारात सुरेश मळेवाडी यांनी भाजपाचे उपाध्यक्ष पद सांभाळले.  शिवाय मळेवाडी परिवारातील भाऊ, वहिनी, आणि स्वत: उमेेश यांनीही सरचिटणीस, भाजप किसान आघाडीचे पद सांभाळले.  पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता ही ओळख कायम ठेवली.   सुरेश मळेवाडी आणि संपूर्ण परिवार भाजपाचेच आहेत. त्यामुळे मतदारांनी कोणतीही शंका न घेता उमेश मळेवाडी यांना आपले निर्णायक मत अ‍ॅटो रिक्षाला देऊन बाजार समितीवर निवडून द्यावे असे आवाहन मळेवाडी मित्र  परिवार (राजूर) यांनी केले  आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow