पद्मशाली समाजाला संधी! शहर मध्यची उमेदवारी

भाजपाने शब्द पाळला,४ आमदार आणण्याची शपथ *'लक्ष्यवेध'चा परफेक्ट न्यारेटीव्ह*

Oct 26, 2024 - 18:20
 0  413
पद्मशाली समाजाला संधी! शहर मध्यची उमेदवारी

(विजयकुमार पिसे)

सोलापूर : सोलापूर शहर मध्य मतदारसंघात भाजपाने शब्द पाळला. तेलुगू भाषिक विणकर पद्मशाली समाजाला संधी दिली. 

देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता शहर उत्तर आणि शहर मध्य व दक्षिण सोलापूर तसेच अक्कलकोट मतदारसंघातील भाजपाचे चार उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी तेलुगू भाषिक विणकर पद्मशाली समाजाची आहे. शहर मध्य मतदारसंघात पद्मशाली समाजाला संधी ही *"लक्ष्यवेध" ची पोस्ट परफेक्ट न्यारेटीव्ह* पुन्हा एकदा ठरली आहे. 

 शहर मध्य येथे पद्मशाली समाजाला भाजपाने उमेदवारी दिली तर चार आमदार सहज निवडून येईल. भाजपासाठी हा बोनस ठरणार, असा विश्वास आहे. आता समाजाने या विश्वासाला साथ देणे क्रमप्राप्त आहे.

*भाजपाचे सोशल इंजीनियरींग*

    शनिवारी सायंकाळी भाजपाने २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये शहर मध्य मतदार संघासाठी देवेंद्र कोठे, पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात आमदार समाधान आवताडे आणि शेजारच्या जत मतदार संघात धनगर समाजाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली असून या उमेदवारांना दिलेली संधी म्हणजे भाजपने केलेले "सोशल इंजिनिअरिंग"चे नॅरिटीव्ह. तसेच या या समाजावर भाजपने व्यक्त केलेला विश्वास. 

 शहर मध्य येथे तेलगू भाषिक पद्मशाली विणकर समाजाला उमेदवारी दिल्यामुळे शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर तसेच अक्कलकोट या मतदार संघात जोडलेला गोदुताई विडी नवीन घरकुल येथील भाजपाच्या तीनही उमेदवारांना तेलुगू भाषिक पद्मशाली विणकर समाजाची निर्णायक मते मिळतील. जेणेकरून शहर मध्य मतदार संघ तेलुगू भाषिक पद्मशाली विणकर समाजामुळे १)शहर उत्तर, २)दक्षिण सोलापूर व ३)अक्कलकोट आणि एक जास्तीचा मतदारसंघ म्हणून ४) शहर मध्य या चार ही मतदार संघात कमळ फुलेल, असे निकाल अपेक्षित आहेत. 

*लक्ष्यवेधवर अभिनंदनाचा वर्षाव*

लक्ष्यवेध न्यूज पोर्टलवर चालवलेली न्यूज़ पोस्ट परफेक्ट ठरल्यामुले अनेक वाचकांनी अभिनंदन केले. तसेच अचूक "एनालिसिस" व "डेप्थ" याबद्दलही अनेकांनी चर्चा केली. दोन महिन्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्तिगतरित्या केलेल्या सर्वेक्षणात आम्ही येथील परिस्थिती विषद केली होती. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत निवडणूक विषयक "लक्ष्यवेध"च्या पोस्ट पोहोचल्या गेल्या होत्या. या सार्याचा परिणाम समोर आहे. आता "लक्ष्य" ४ आमदार जिंकवून चौकार खेचण्याचा

भाजपची दुसरी यादी 

भाजपची दुसरी यादी जाहीर

राम भदाणे- धुळे ग्रामीण

चैनसुख संचेती – मलकापूर

प्रकाश भारसाखळे – अकोट

विजय अग्रवाल – अकोला पश्चिम

श्याम खोडे – वाशिम

केवलराम काळे – मेळघाट

मिलिंद नरोटे – गडचिरोली

देवराम भोंगले – राजुरा

कृष्णलाल सहारे – ब्रह्मपुरी

करण देवताळे – वरोरा

देवयानी फरांदे – नाशिक मध्य

हरिश्चंद्र भोये -विक्रमगड

कुमार आयलानी – उल्हासनगर

रवींद्र पाटील – पेण

भीमराव तापकीर – खडकवासला

सुनील कांबळे – पुणे छावणी

हेमंत रासने – कस्बापेठ

रमेश कराड – लातूर ग्रामीण

देवेंद्र कोठे – सोलापूर शहर मध्य

समाधान आवताडे – पंढरपूर

सत्यजित देशमुख – शिराळा

गोपीचंद पडळकर – जत

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow