आजी,माजी आमदारांच्या तीन सौभाग्यवती झेडपीत
आजी,माजी आमदारांच्या तीन सौभाग्यवती झेडपीत
(विजयकुमार पिसे)
सोलापूर जिल्हा परिषदेत प्रथमच एकहाती सत्ता संपादन करताना भाजपने 68 पैकी 37 जागा जिंकून आपले वर्चस्व राखले आहे.याचबरोबर दोन आजी,माजी आमदारांच्या सौभाग्यवतीनीही झेडपीत प्रवेश केला आहे.
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी सचिन कल्याणशेट्टी या चपळगाव जिल्हा परिषद गटातून प्रचंड मताधिक्क्यानी विजयी झाल्या आहेत. त्याचबरोबर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते या सुद्धा दहिगाव जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या आहेत. या दोन महिला उमेदवारांचे नाव पहिल्या दिवसापासून चर्चेत होते. तसेच दक्षिण सोलापूरचे माजी आमदार रतिकान्त पाटील यांच्या पत्नी लक्ष्मी पाटील या शिंदे सेनेकडून हत्तुर जि.प.गटातून जिंकल्या.
संस्कृती आपल्या चार महिन्याच्या बाळाला घेऊन प्रचारात उतरल्या होत्या. राम सातपुते यांच्या सलग दोन पराभवानंतर त्यांचे राजकारण संपले. आता हे पार्सल परत पाठवून द्या, शब्दात खिल्ली उडवत असत. आज निवडणूक जिंकल्यानंतर त्यानी शड्डू ठोकून विरोधकांना आव्हान दिले होते.
आ.कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी यांनीही विरोधकांना चितपट केले. या ठिकाणी कल्याणशेट्टीन्चे बंधू सागर यांनीही विजय संपादन केला.
शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या मातोश्री व रतिकान्त पाटील यांच्या पत्नी प्रथमच निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. हत्तूर गटातून भाजपचे हविनाळे (बरूर) यांचा पराजय केला.
What's Your Reaction?





