बापूंचा गुरुपुष्यामृत योग आणि ह्याट्ट्रिकची संधी

आ. सुभाष देशमुखांसह बंजारा समाजाचे पवार, राठोड व सोमेश वैद्य यांचेही अर्ज दाखल

Oct 24, 2024 - 13:35
 0  315
बापूंचा गुरुपुष्यामृत योग आणि ह्याट्ट्रिकची संधी

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी माजी सहकारमंत्री आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरुपुष्यामृत योग साधून अर्ज भरला असून यंदा हॅट्ट्रिक करण्याचा त्यांचा निर्धार आहे. तसेच आज वंचित आघाडीच्या वतीने संतोष पवार आणि युवराज राठोड बंजारा समाजाच्या युवा उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. 

बापूंचा अर्ज भरताना त्यांच्यासमवेत भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रामप्पा चिवडशेट्टी व अन्य उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी निवासस्थानी सुभाष देशमुख यांना त्यांची नात इविका या चिमुकलीने औक्षण केले. तिसऱ्यांदा आमदार होण्याच्या शुभेच्छा चिमुकलीने दिल्या.

अर्ज भरल्यानंतर आमदार देशमुख म्हणाले, मतदारसंघात वडापुर बॅरेज, भीमा सीना जोड कालवा, मंद्रुप एमआयडीसी मंजूर आहे. विकासच्या बळावर विजय निश्चित आहे. निश्चितच तिसऱ्यांदा मतदार मला निवडून ह्यट्ट्रीक करतील.   

 *राठोड,पवार,वैद्य यांचेही अर्ज*

  दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मार्ग फाउंडेशनचे संतोष पवार आणि दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीचे युवराज राठोड यांनीही उमेदवार अर्ज दाखल केले. पवार आणि राठोड बंजारा समाजाचे युवा नेतृत्व असून या मतदारसंघात बंजारा समाज हे निर्णायक आहे. गत निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांनी अपेक्षित मते खेचून घेतली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पवार आणि राठोड कुणाला शह देतात हे निकालचे वेळी कळेल. 

सोमेश वैद्य पडले एकटे

तसेच भाजपा नगरसेवकांचे पाठिंब्याचे पत्र घेऊन प्रबल दावेदारी करणारे (सोमेश) सोमनाथ वैद्य यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु आता वैद्य एकाकी पडले आहेत. त्याला पाठिंबा देणारे भाजपाचे एकही नगरसेवक, माजी उपमहापौर वा पक्ष पदाधिकारी वैद्यांच्या पाठीशी राहिलेले नाहीत, हे विशेष. 

*मात्र यावेळी दक्षिण सोलापूर मतदारसंघात 2014 सारखी परिस्थिती तयार होत असल्याचे चित्र प्रथमदर्शनी स्पष्ट होते*

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow