उबाठाचा सांगली पॅटर्न; काडादी, मानेंकडे लक्ष!

अमर पाटलांच्या उमेदवारीने मविआत फाटाफूट अटळ? दक्षिणमधून काँग्रेसचा "पंजा" गायब. "लक्ष्यवेध"ची पोस्ट परफेक्ट न्यारेटीव्ह

Oct 24, 2024 - 17:14
 0  611
उबाठाचा सांगली पॅटर्न; काडादी,  मानेंकडे लक्ष!

(विजयकुमार पिसे)

 सोलापूर, : खा.संजय राऊत लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील 'सांगली पॅटर्न' अवलंबल्याचा पहिला परिणाम दक्षिण सोलापुरात दिसला. ही जागा परंपरेने काँग्रेसची. पण ठाकरे सेनेच्या उमेदवारीने काँग्रेसचा "हाताचा पंजा" येथून गायब होणार आहे. दरम्यान काँग्रेसचे दिलीप माने आणि शरद पवारांची तुतारी घेण्यासाठी त्यांच्या दारी गेलेले सिध्देश्वर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांची भूमिका काय, याकडे लक्ष लागले आहे.

  दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात गेल्या महिन्यात खा. संजय राऊत यांनी यांनी मेळावा घेतला होता, तेव्हा "लक्ष्यवेध न्यूज़ पोर्टल"वर दक्षिण सोलापूर मतदारसंघात "ठाकरे सेनेचा सांगली पॅटर्न" ही पोस्ट चालवली होती, अमर पाटील यांची उमेदवारी जाहीर करून ठाकरे सेनेने काँग्रेसवर कुरघोडी केली, त्यामुळे लक्ष्यवेधची ती पोस्ट अचूक ठरली आहे. परफेक्ट न्यारेटीव्ह आहे.

सांगलीच्या लोकसभा निवडणुकीत ती जागा काँग्रेसची असताना शिवसेनेने आपला उमेदवार देऊन काँग्रेसवर कुरघोडी केली, त्यामुळे काँग्रेसला उमेदवार देता आला नाही. मात्र बंडखोरी करून विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी निवडूनही आणली.  

आता पुन्हा हाच पॅटर्न दक्षिण सोलापुरात काँग्रेस विरोधात आणला आहे. त्यासाठी खा. राऊत यांनी मेळावाही घेतला. अमर रतिकांत पाटील यांना विधानसभेची उमेदवारी देण्याची घोषणाच नव्हे तर एबी फार्म देखील दिला आहे.

  अमर पाटील यांचे पिताश्री रतिकांत पाटील यांचा २००९ मध्ये काँग्रेसचे दिलीप माने यांनी त्यांचा पराभव केला. त्याचे उट्टे काढण्यासाठी पाटील परिवाराने कंबर कसली आहे. त्यासाठी 

 खा. राऊतांचे बळ आहे. विशेष म्हणजे सोलापूरमधील उबाठा मेळाव्यानंतर त्याच दिवशी खा. राऊत "जाई जुई" फार्म हाऊसवर सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. उबाठाला जागा सोडणे व अमर पाटलांना तिकीट देणे हा "टाकळी मार्ग" काडादी आणि माने यांची कोंडी करण्याचा डाव आहे. त्यामुळे हा डाव उधळण्यासाठी कोणता काटशह पुढे येईल याकडे लक्ष आहे. पण या दक्षिण मतदारसंघात पवारांच्या तुतारीचा डाव काँग्रेसच्या "नानां"नी उधळला, हे सकृतदर्शनी तरी दिसते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow