शिवसेनेचा एकच नगरसेवक; तरीही उमेदवारी लादणार?
भाजपाचे १७ नगरसेवक, मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा, शिवसैनिकांचा सवाल, कोण प्रमोद मोरे?

(विजयकुमार पिसे)
सोलापूर : सोलापूर शहर मध्य मतदार संघात प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेकडून काँग्रेसला आमदारकीचे गिफ्ट मिळाले. आताही बाहेरचा उमेदवार लादणार, अशी चर्चा आहे. शिवसेना हाराकिरी करणार असेल तर मतदारांवर हा घोर अन्याय ठरेल. या मतदारसंघात भाजपाचे सर्वाधिक १७ नगरसेवक आहेत. आणि शिवसेनेकडे फक्त एकच नगरसेवक, त्यामुळे शहर मध्यवर भाजपाचा दावा व्यर्थ ठरणार नाही.
भाजप- शिवसेनेची युती आहे. परंतु विधानसभा व महापालिका निवडणुकीत सेनेची सुमार कामगिरी, त्या उलट भाजपा सरस आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारीचा दावा केला आहे. तसेच भाजपाकडे चेहरा असलेले तुल्यबळ उमेदवार देखील आहेत. याउलट सेनेकडे उमेदवार कोण, त्यांचा चेहरा? याचा कानोसा घेतला असता पुन्हा एकदा त्यांची हाराकिरी अटळ आहे. त्यामुळे भाजपाने मध्य मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत द्यावी, ही मतदारांचीच मागणी आहे.
सेनेच्या गोटातून धक्कादायक माहिती म्हणजे अक्कलकोट तालुक्यातील उपरा उमेदवार नक्की केला आहे. प्रमोद ब्रह्मानंद मोरे (कुरनूर) आहेत. जे सोलापूरला कचरापूर म्हणून हिणवले जाते. कारण प्रमोद मोरे यांच्याशी संबंधित कंपनी सोलापूर शहरातील कचरा संकलन करणार्या घंटागाडीचे ठेकेदार आहेत. शिवसेनेचे संभाव्य उमेदवारास *"जनसेवक"* उपाधी कधी लागली, असा प्रश्न या मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकच उपस्थित करत आहेत. त्यामुळे भाजपाकडून मदतीची अपेक्षा काय करणार? गेल्या आठवड्यात आणि आज देखील शहरातील अनेक भागात घंटागाडी येत नाही. नागरिकांना घरातच पाच-सहा दिवस कचरा साठवून ठेवावा लागतो, या घंटागाड्या कचरा संकलनासाठी येतात म्हणजे सोलापूरचा कचरापूर आणि नागरिकांच्या घरात अनारोग्यास जबाबदार असलेले ठेकेदार मोरे, महापालिका प्रशासन यांची मिलीभगत असावी असा संशय येतो. सोलापूर शहराचा पाणीपुरवठा आठवड्यातून एकदा होतो, तसेच
घंटागाडीचे होत आहे. ठेकेदार जनसेवक सेनेचा उमेदवार म्हणून बाहेरचा उमेदवार लादणार?
सूज्ञ मतदार देखील न पेक्षा त्यांची मते काँग्रेसलाच गेली तर? जे 2009, 14 आणि 19 च्या निवडणुकीत झाले, त्याची पुनरावृत्ती होत असेल तर तो अन्यायकारक ठरेल. म्हणून भाजपाने उपरा-ठेकेदार उमेदवाराची पालखी वाहण्यापेक्षा लढत द्यावी. आणि महायुतीच्या खात्यामध्ये एका आमदाराची भरती करावी, ही मतदारांची अपेक्षा आहे.
प्रसंगी शहर मध्य मतदार संघात मैत्रीपूर्ण लढत झाली तरी भाजपाच सरस ठरणार आहे. तुलनात्मक अभ्यास केला तर भाजपाचे १७ नगरसेवक, काँग्रेसचे आठ, एमआयएम ४, एक शिवसेना, एक माकपा. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आले होते. पैकी राजकुमार हंचाटे आणि अनिता मगर हे भाजपात आहेत. विनायक कोंड्याल हे महेश कोठेंचे भाचे.. ते देखील
तुतारीवाले झाले आहेत. सेनेचे एकमेव नगरसेवक भारतसिंग बडूरवाले, या एकमेव नगरसेवकच्या जीवावर शिवसेनेचा उमेदवार निवडून द्यावा, १७ नगरसेवक असूनही भाजपाने पालखी व्हावी हे मतदारांना अपेक्षित नाही. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या बाजूने काँग्रेस, माकपा, एमआयएम, राष्ट्रवाद काँग्रेस ही मोठी फौज असतानाही८९४ इतके अल्प मताधिक्य मिळाले आहे. शिवाय यापूर्वीच्या तीन निवडणुकीत शिवसेना कधीच विजयासाठी लढली नाही. त्यामुळे दारुण पराभव होत राहिला. तिसरा, चौथा, व पाचवा क्रमांक अशी नामुष्कीजनक स्थिती शिवसेनेची आहे. दरम्यान प्रमोद मोरे हे मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून शिफारस अशीही चर्चा आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे फेवरीट मनीष काळजे, शिवाजी सावंत, ज्योती वाघमारे ही नावे चर्चेत आहेत. परंतु उमेदवार तुल्यबळ आहेत का? महायुतीच्या संख्याबळात एक ने भर घालण्यासाठी भाजपाने शहर मध्य ची निवडणूक लढवावी, ही मागणी जोर धरू लागली आहे. आणि हाच एकमेव चांगला पर्याय आहे.
What's Your Reaction?






