सोलापुरात "देशमुख & देशमुख"च, सचिनदादा पर्व 0.2

आ.विजयकुमार देशमुख यांना वाढदिवसाची भेट, दक्षिण सोलापूरमध्ये पुन्हा लढ बापू

Oct 21, 2024 - 08:59
 0  258
सोलापुरात "देशमुख & देशमुख"च, सचिनदादा पर्व 0.2

(विजयकुमार पिसे)

सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने ९९ जणांची उमेदवारी जाहीर करून सर्वप्रथम बाजी मारली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील १६ उमेदवार असून सोलापुरात देशमुख अँड देशमुख आणि अक्कलकोटमध्ये पुन्हा सचिनदादा पर्व ०.२ कमळ कम फुलणार आहे. 

  पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी रविवारी पहिली यादी जाहीर केली. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह ९९ उमेदवार आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील 16 जणांचा समावेश आहे. 30% टक्के उमेदवारांना कात्री हे माध्यमांचे "लाडके सूत्र" फोल ठरले. आणि अनेक आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे. सोलापूर शहरातील शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर या ठिकाणी विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख आणि अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी हे चेहरे कायम आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन देशमुखांना बदला आणि आम्हाला संधी द्या, अशी मागणी करणारे अनेक इच्छुकांची निराशा झाली. आहे. देशमुख अँड देशमुख हे समीकरण भाजपासाठी पक्के आहे, हे या निमित्ताने अधोरेखित झाले. विशेष म्हणजे विजयकुमार देशमुख यांचा २१ ऑक्टोबरला वाढदिवस, या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा उमेदवारी देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा रुपी *गिफ्ट* दिले आहे. या निमित्ताने रविवारी सायंकाळी राजवाडे चौकात त्यांच्या समर्थकांनी एक दिवस आधीच वाढदिवस साजरा करून जल्लोष केला. आणि गतवेळेपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून विधानसभेत *पंचकार* मारण्याचा विजयी निश्चय केला आहे.

   दक्षिण सोलापूर मतदार संघात सुभाष देशमुख यांच्या विषयी नाराजी व्यक्त करून भूमिपुत्रांना संधी द्या, अशी मागणी केली जात होती. आणि बापूंना तिकीट मिळणार नाही, असा दावा विरोधकांचा होता. माध्यमांचा अंदाज देखील बापूंनी खोडून टाकला. आणि यंदा *हॅट्ट्रिक* करण्यास सज्ज असून "ठरलंय यंदा बापू तिसर्यांदा" निश्चय केला आहे. अक्कलकोट मतदारसंघात विद्यमान आ. सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या विकासाचा रथ पुन्हा दौडणार असून दादा पर्व ०.2 ही *टॅगलाईन* अक्कलकोट मतदार संघात फिरत आहे. आ. कल्याणशेट्टी यांना देखील उमेदवारी मिळू नये यासाठी माजी आमदारपुत्र रमेश सिद्रामप्पा पाटील यांच्यासह अन्य इछुकांनी प्रयत्न केले होते. येथे येथे सचिन दादा पुन्हा भारी ठरले. सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तीनही मतदार संघात पुन्हा कमळ फुलणार आहे. तशा पद्धतीने सर्व प्रकारचे मतभेद विसरून कार्यकर्ते झोकून देऊन सज्ज झाले आहेत. तीन दिवसांपूर्वीच विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, कल्याणशेट्टी यांना उमेदवारी जाहीर होणार आहे, असा निरोप श्रेष्ठींनी दिला होता. त्या अनुषंगाने तीनही आमदारांनी कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेतल्या. यादरम्यान इच्छुकांनी उमेदवार बदलावेत म्हणून केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले.

   सोलापूर जिल्ह्यात बार्शी, मंगळवेढा-पंढरपूर आणि माळशिरस हे अन्य तीन मतदारसंघ आहेत. तेथे विद्यमान आमदार अनुक्रमे राजेंद्र राऊत समाधान आवताडे आणि राम सातपुते आहेत. यापैकी सातपुते माळशिरसमधून लढणार नाहीत, असे समजते. मंगळवेढा पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक यांचा दावा आहे. त्यामुळे यांची उमेदवारी प्रलंबित ठेवली आहे. बार्शीत आ. राऊत यांच्यासमोर कुणीच प्रबळ नाही, त्यामुळे दुसऱ्या यादीत त्यांची नावे बाहेर होतील अशी माहिती आहे 

*पश्चिम महाराष्ट्रातील 16 उमेदवार* 

1. दौण्ड : ॲड राहुल कुल,

2. चिंचवड : शंकर जगताप,

3. भोसरी : महेश लांडगे,

4. शिवाजीनगर : सिद्धार्थ शिरोळे,

5. कोथरुड : चंद्रकांतदादा पाटील,

6. पर्वती : माधुरी मिसाळ,

7. सोलापूर उत्तर : विजयकुमार देशमुख,

8. अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी,

9. सोलापूर दक्षिण : सुभाष देशमुख,

10. जयकुमार गोरे,

11. कराड दक्षिण : डॉ. अतुल भोसले,

12. सातारा : छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,

13. कोल्हापूर दक्षिण : अमल महाडिक,

14. इचलकरंजी : राहुल आवाडे,

15.मिरज : सुरेश खाडे,

16. सांगली : सुधीर गाडगीळ.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow