विजयादशमी निमित्त संघाचे शस्त्रपूजन व १२ नगरांमध्ये पथ संचलन

चुकीचा नॅरेटिव व दिशाभूल करून देशात हल्लाबोल करण्याचा परकीय शक्तींचा डाव : विजयकुमार पिसे यांचे वक्तव्य, कुंभारी नाका येथे भावनाऋषी नगरचा विजयादशमी उत्सव

Oct 19, 2026 - 13:25
Oct 19, 2026 - 16:13
 0  73
विजयादशमी निमित्त संघाचे शस्त्रपूजन व १२ नगरांमध्ये पथ संचलन

 सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भावनाऋषी नगरच्या वतीने विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन व पथसंचलन उत्साहात पार पडले. विश्‍व हिंदू परिषदेचे विभागमंत्री तथा संपादक विजयकुमार पिसे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. उत्सव रविवार दि. 18 रोजी सकाळी 7 वाजता तनिष्क नगर मैदान, (विनायक नगर) येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
  प्रारंभी शस्त्र व प्रतिमा पूजन शहर सहकार्यवाह प्रवीण चिक्कळी, नगर कार्यवाह संतोष पतंगे व प्रमुख वक्ते विजयकुमार पिसे यांनी केले. 
100 वर्षापूर्वी संघ स्थापना, डॉ.हेडगेवार यांची दूरदृष्टी, देश, देव, धर्मासाठी तसेच  संकटसमयी सर्वप्रथम संघच धावून येतो हा अनुभव आहे. 

      शताब्दी निमित्त पंचपरिवर्तनाचे महत्व लक्षात आले. तसेच  संघाचे स्वयंसेवक देखील1)सदस्यत्व, 2)स्वयंसेवक, 3)दायित्ववान 4)दायित्वबोध 5)कार्यकर्ते. अशा भूमिकेत नेहमीच सक्रिय असतात. संघाचे मिशन आजही संपलेले नाही. संघावर तीन वेळा बंदी आली. पण बंदी आणणारे संपले. आज कथित आणीबाणीची रडकथा सांगितली जाते. 50 वर्षापूर्वीची आणीबाणी कशी आणि कोणी आणली, हे त्यांना लक्षात आणून द्या.  Gen-z, जंतर मंतर. एसआयआर, जनगणना, चेंज ऑफ डेमोग्राफच्या माध्यमातून तसेच चुकीचा नॅरेटिव व दिशाभूल करून देशात हल्लाबोल करण्याचा परकीय शक्तींचा डाव उधळून असून तो उधळून लावायचा आहे. यासाठी आपण जागरूक राहून पुन्हा एकदा  लंका दहन करायचे असे पिसे यांनी 
याप्रसंगी सांगितले.


   यावेळी गणवेशातील स्वयंसेवकांचे सघोष पथसंचलन  विनायक नगर, कुंभारी  नाका, भागातून काढण्यात आले. यावेळी स्वयंसेवकांनी शंख, दल, किरण अशा विविध रचना सादर केल्या. घोष पथकाच्या वादनाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. पथसंचलन मार्गावर नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत केले. जगदीश कर्रे, श्रीनिवास श्रीराम, अ‍ॅड. शांतवीर महिंद्रकर, अ‍ॅड.कुर्री, चंद्रकांत धोंडे, नगरसेवक बसवराज केंगनाळकर, नगरसेवक व्यंकटेश कोंडी उपस्थित होते.
  दरम्यान रविवारी अण्णाभाऊ साठे नगर,  भवानी नगर, श्रीराम नगर, भावनाऋषी नगर  या चार नगरांचे त्या त्या भागातून संचलन पार पडले. यावेळी 600 पेक्षा अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. तसेच यंदा 12 ठिकाणी पथ संचलनाचे नियोजन केेले आहे.  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow