पत्रकार तेजस मुद्दे यांचा सत्कार
वडार समाजातील गुणवंत 82 विद्यार्थ्यांचा गौरव, मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी पाठबळ द्या: उपायुक्त नागेश चौगुले
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश खरेच कौतुकास्पद पात्र आहे. मात्र विद्यार्थ्यांनी यावरच न थांबता मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी पालकांनी आपल्या खांद्यावर घेऊन त्या विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचे उपायुक्त तथा सांगली जिल्ह्याचे जात पडताळणी समितीचे सदस्य नागेश चौगुले यांनी व्यक्त केले. यावेळी युवा गुणवंत पत्रकार तेजस मुद्दे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मी वडार महाराष्ट्राचा, वडार ज्ञाती संस्था, श्री रूपाभवानी खाण क्रशर संघटना, सोलापूर शहर जिल्हा वडार समाज युवक संघटना, विद्यार्थी आणि महिला संघटना यांच्यावतीने वडार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव चौगुले यांच्या हस्ते पार पडला. प्रमुख अतिथी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक राजू शिंदे, सहायक वाहन निरीक्षक विद्यादेवी जाधव, पोलीस पल्लवी देवरे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर सेंटरचे अध्यक्ष संतोष कलगुटगी, सोलापूर जिल्हा खाण क्रशर संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण विटकर, वडार ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष मनोहर मुधोळकर, विद्युत सहाय्यक अधिकारी पंकज गुंजोटी, बाबुराव निंबाळकर, माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल, राजू लिंबोळे, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन तथा मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रवी शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष रेणुका निंबाळकर, शहराध्यक्ष ज्योती चौगुले, अंजली विटकर, सुरेखा मंजुळकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले. विविध परीक्षांमधील गुणवंत 82 विद्यार्थ्यांचा तसेच पोलीस निरीक्षक राजू शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौगुले व दिलीप जाधव, वरिष्ठ लिपिक चंद्रकांत साळुंखे यांचा सेवानिवृत्ती निमित्त तसेच रवी शिंदे, महेश अलकुंटे, काशिनाथ आनंदकर, लहू बंदपट्टे यांचाही सत्कार झाला.
*दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादकपदी गुणवंत युवा पत्रकार तेजस मुद्दे यांची निवड झाल्याबद्दल सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, पुष्पगुच्छ व लेखणी देऊन त्यांचा विशेष गौरव झाला. मुद्दे मूळचे लातूर शहराचे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. आजोळी (सोलापूर) शिक्षण पूर्ण झाले. प्रतिकूल परिस्थितीमध्येही शिक्षणात अव्वल दर्जा राखला. शिवाय डीटीपी ऑपरेटर म्हणून तरुण भारतमध्ये नोकरीही केली. विद्यापीठात पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या गुणवत्तेच्या आधारावर दिव्य मराठीत उपसंपादक म्हणून संधी मिळाली. वडार समाजासाठी हे अभिमानास्पद आहे.*
राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी वडार समाजातील गरीब, गरजू, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे नमूद केले.
या विद्यार्थ्यांना खाण क्रशर संघटनेच्या माध्यमातून दत्तक घेतले जाणार असल्याचे जाहीर केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विष्णू चौगुले, राजेंद्र निंबाळकर, संजय चौगुले देविदास लिंबोळे, विपुल अलकुंटे, अनिल चौगुले आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुनील शिंदे, प्रशस्तीपत्रकाचे लेखन षण्मुखानंद दाते तर काशिनाथ आनंदकर यांनी आभार मानले.
What's Your Reaction?