कार्यकर्त्यांसाठी शेवटची संधी; आता लक्ष्य २०२९!

नव भाजपायींची पसंती कोणाला? 9स्वीकृत सदस्य व स्थायी,परिवहन समितीचा अध्यक्ष देखील कळणार!चरैवेती चरैवेती यही तो मंत्र है अपना। नही रूकना, नही थकना, सतत चलना, सतत चलना यही तो मंत्र है अपना..।

Feb 18, 2026 - 12:09
 0  171
कार्यकर्त्यांसाठी शेवटची संधी; आता लक्ष्य २०२९!

 (विजयकुमार पिसे)
तब्बल 87 सदस्य जिंकलेल्या मनपा सभागृहात भाजपाला सुपर,डुपर बहुमत, शिवाय 9 स्वीकृत सदस्यांचा बोनस, स्थायी व परिवहन समितीचे सदस्य आणि चेअरमन कोण याचा उलगडा येत्या 48 तासात होईलच. ही संधी कुणाला हे एव्हाना संबंधितांना समजले असेलच. फक्त अधिकृत घोषणा मनपा सभागृहात होईल. 1980 भाजपा स्थापनेपासून दिल्लीत आपल्या विचाराचे सरकार येईल, म्हणून ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या. *काँग्रेसी राजवटीकडून हाल झाले.कुचेष्टा झाली,अवहेलना आली. पण स्वाभिमान टिकवला. अशा तमाम निष्ठावंत सामान्य कार्यकर्त्यांसाठी ही शेवटची संधी असेल. कारण आता 'लक्ष्य फक्त 2029.' परंतु हे ठरवण्याचा अधिकार भाजपात काल परवा अलीकडे आलेल्या *नव भाजपायींना आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निराश न होता, पुन्हा 2029 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या तयारीला कटिबध्द व्हायचे आहे. अशा सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊयात! आता संधी मिळेल की नाही माहीत नाही. तरीही.. *चरैवेती चरैवेती यही तो मंत्र है अपना। नही रूकना, नही थकना, सतत चलना, सतत चलना यही तो मंत्र हे अपना..।
   सोलापूर महापालिका कार्यक्षेत्रात आणि निवडणूक प्रक्रियेत सक्रिय असलेले चार आमदार, मंत्री,अध्यक्ष यांनी यंत्रणा यशस्वीपणे हाताळली. कुणाचा घाटा आणि अधिकचा वाटा मिळाला हे चित्र समोर आहेच, त्या आधारेच 9 सदस्य, स्थायी समिती आणि परिवहन समितीचा देखील कोटा समोर येईल. पण सर्वाधिक फायदा झाला काँग्रेसी व अन्य विचाराचा. ज्यांचे इनकमिंग झाले, पक्ष प्रवेश न होताच तिकीट मिळाले. या संदर्भात लक्ष्यवेधने मनपा निवडणुकीत भाजपाचा *बी प्लॅन हे वृत्त प्रकाशित केले, त्याची सत्यता पडताळून पाहता येईल. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचे मत आहे की आता देखील *भाजपाचा बी प्लॅन असेल. असो.. 
    प्राप्त माहितीनुसार ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी माघार घेतली, सामाजिक संतुलन झाले नाही, अभ्यासू, तज्ञ यांना संधी मिळाली नाही. अशांना स्वीकृतमध्ये संधी मिळू शकेल. एक माहिती पक्षाकडून आवर्जून सांगितली गेली होती, पराभूत उमेदवारांना स्वीकृतसाठी संधी नाही. यामध्ये किती तथ्य आहे? हे कळेलच.

https://lakshyawedh.com/solapur-municipal-coroporation-bjp-candidate-direct-tikect-final


   प्रथम दर्शनी पक्षाचे कप्तान अध्यक्ष असलेल्या रोहिणी तडवळकर यांचे नाव नक्की असल्याचे सांगितले जाते. याशिवाय अपेक्षितांमध्ये मोहन डांगरे, रूद्रेश बोरामणी, पांडुरंग दिड्डी, शशी थोरात, हेमंत पिंगळे, जगदीश पाटील, अविनाश महागावकर, जय साळुंके, गुरूशांत धुत्तरगाव, कार्यालयमंत्री श्रीहरी म्याकल,  रामभाऊ तडवळकर, प्रभाकर जामगुंडे, नागेश वल्याळ, अमोल कारंडे, अक्षय अंजीखाने, प्रशांत फत्तेपूरकर, नागेश सरगम, श्रीनिवास दायमा, बाशाभाई शेख, डॉ.रफीक सय्यद, सुनील गौडगाव, गोपीकृष्ण वड्डेपल्ली, विठ्ठल कोटा, रवी नादरगी, विनोद केंजरला, विजया वड्डेपल्ली, साधना संगवे, सुधा अळ्ळीमोरे, इंदिरा कुडक्याल, विजय कालाणी, राजू माने, दिलीप पतंगे, प्रवीण डोंगरे, भूपती कमटम, सदानंद गुंडेटी,बजरंग कुलकर्णी,सचिन कुलकर्णी, देवेंद्र भंडारे, बाबा करगुळे, विजय महिंद्रकर, संजय/महेश मेंगजी, राजकुमार हंचाटे, मनोज कलशेट्टी, उमेश जमादार परिवार, मारता, चंद्रकांत रमणशेट्टी, केदार उंबरजे, सागर अतनुरे, डॉ.सरतापे,मनीष देशमुख, पत्रकार मनीष केत, परमेश्‍वर माळगे, पी.आर.कुलकर्णी, यशवंत पाथरूट, अंबादास बोगा, संतोष सोमा, विजय कुलथे, संजय साळुंके, कुमुद अंकारम, संतोष गड्डम, दिलीप कोल्हे, नागेश ताकमोगे, राजू आलुरे, पद्माकर काळे, नागनाथ शिवशिंगवाले, एस.के. कोळेकर, सतीश सुरवसे, जगदीश व्हंड्राव, शशी अन्नलदास, अंबादास बिंगी, केतन शहा, सचिन चौधरी,भीमराव कुंभार, राजू राठी, वनकुद्रे, पेंटप्पा गड्डम, अविनाश बेंजरपे,श्रीकांत घाडगे, राम वाकसे,राजश्री चव्हाण,रवी भवानी... कार्यकर्त्यांची अशी भली मोठी यादी आहे. याशिवाय काही अनपेक्षित नावे देखील समोर येऊ शकतात. त्यांनाही संधी मिळू शकते.
   ..आणि देवाभाऊ व पक्षश्रेष्ठी निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी आणि सामाजिक संतुलन (सोशल इंजिनिअरींग) साधणार असतील तर स्थाानिक नेत्यांच्या सोयीनुसार आलेल्या नावांना ब्रेक बसेल. त्यामुळे ज्या समाजाचे बहुमत (उदा.मराठा,लिंगायत,पद्मशाली, धनगर) सध्या सभागृहात आहे, अशा समाजातून आलेली शिफारस मागे सारली जातील. गेल्या 24 तासापासून प्रदेश पक्षश्रेष्ठी याबाबत सतर्क झाले अशी नवीन माहिती समोर आली आहे. तसे झालेच तर शेवटाच्या संधीचे चीज होईल. परंतु *नव भाजपायींना 2029 चे वेध लागले आहेत. त्याची सुरवात त्यांनी केव्हाच केली आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी जुंपून घ्यायचे आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow