विहिंपच्या प्रभावती सारोळकर यांच्या स्मृत्यर्थ आज शिवस्मारकात शोकसभा
विहिंपच्या प्रभावती सारोळकर यांच्या स्मृत्यर्थ आज शिवस्मारकात शोकसभा
सोलापूर दि.18 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक स्वर्गीय बापूराव तथा भास्करराव सारोळकर यांच्या धर्मपत्नी तसेच श्रीप्रभू रामचंद्राच्या जन्मभूमी आंदोलनातील विश्व हिंदू परिषदेच्या पहिल्या कारसेविका, पहिल्या महिला जिल्हा मंत्री तथा विश्व हिंदू परिषद गोसंवर्धन आयामाचे जिल्हा प्रमुख अमित सारोळकर यांच्या मातोश्री स्वर्गीय प्रभावती सारोळकर यांचे सोमवार दि.9 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शोकसभेचे आयोजन सोलापूर येथील शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृहात बुधवार दि.18 रोजी दुपारी चार वाजता आयोजित केलेली आहे.
या शोकसभेस विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र संघटनमंत्री अनिरुद्ध तथा अण्णा पंडीत, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष प्रा.गजानन धरणे,विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहमंत्री नितीन वाटकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह ॠषीकेश कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. या शोकसभेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद,बजरंग दल व संघ परिवार व सारोळकर परिवारावर हृदयप्रेम करणारे सर्व आत्मिय स्वयंसेवक बंधु भगिनींनी व संघ परिवारासाशी संबंधित असलेल्या संस्था, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?