निवडणुकीनंतर पुन्हा ऑपरेशन लोटस; घड्याळाची वाजली टिकटिक

20 तारखेला दिसेल पिक्चर, सोलापुरात काही नेत्यांचे इनकमिंग?

Feb 17, 2026 - 00:59
 0  71
निवडणुकीनंतर पुन्हा ऑपरेशन लोटस; घड्याळाची वाजली टिकटिक

(विजयकुमार पिसे)

स्था.स्व.सं.निवडणुकीत घाऊक आयारामना संधी देऊन सत्ता स्थापना झाली. त्यास अजून महिना देखील उलटला नाही. सोलापुरात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस झाले. आता येत्या 20 तारखेला पिक्चर दिसेल, अशी चर्चा आहे. स्वीकृत, स्थायी समिती आणि परिवहन समिती सदस्यांची निवड या दिवशी होणार आहे. तेव्हा घड्याळाचीही टिकटिक वाजलेली दिसेल. 

    102 पैक़ी 87 सदस्य जिंकून भाजपाने महापालिकेत सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेची निवडणुकीपूर्वीची युती नंतर बहुदा खंडित झाली. राष्ट्रवादीचा एकमेव सदस्य सभागृहात असून तो कोणत्याही क्षणी भाजपासोबत अ‍ॅडजेस्ट होऊ शकतो. ही वस्तुस्थिती होती. पण शिंदे सेना राहिली गाफील. भाजपाने नेमका डाव साधला. सोमवारी पुणे विभागीय आयुक्तालयात वैभव हत्तुरे आणि नरेंद्र काळे यांनी एकत्रित जाऊन अर्ज सादर केला. सायंकाळी चार वाजता *लक्ष्यवेध न्यूजने सर्वप्रथम ही *ब्रेकिंग न्यूज दिल्यानंतर राजकीय पक्ष आणि माध्यमकर्मीना ही माहिती समजली. 

  हत्तुरेंनी भाजपासोबत बिनशर्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षानेही त्यास मान्यता दिल्याचे समजते. याचा परिणाम स्वीकृत सदस्य निवडीवर होणार आहे. 

काल सोलापुरातील एका हॉटेलमध्ये ऑपरेशन लोटसवर मोहोर लागली. तसेच काही नेत्यांचे इनकमिंग देखील झाले असे समजते. त्यामुळेे उभय पक्षात संतोष आणि आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.

     दरम्यान ऑपरेशन लोटसचा पिक्चर येत्या 20 तारखेला सभागृह नेता नरेंद्र काळे सादर करतील. तेव्हा स्वीकृतच्या यादीत निष्ठावंत किती, आयाराम किती हे स्पष्ट होईलच. या ठिकाणी लॉटरी लागली नाही तर डीपीडीसी समितीमध्ये वर्णी लावण्याची हमी आयारामना आणि निष्ठावंतांना असेल. निष्ठावंत किती ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असू नये, अशी कार्यकर्त्यांची फक्त माफक अपेक्षा राहिली आहे. परंतु सर्वच कार्यक़र्त्यांना संधी देऊ शकत नाही, कारण पक्षाचा विस्तार वाढला आहे, बाहेरून आलेल्या मंडळींना सन्मान देण्यासाठी कार्यकर्त्यांनीच जरा सबुरीने राहिले पाहिजे, अशी नव्या भाजपायींची भूमिका आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow