अशा नावांची फक्त चर्चा

सोलापूर एमएलसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातील निष्ठावंत कार्यकर्ते शहाजी पवार यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. १९९७ पासून पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना यावेळी संधी मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

May 23, 2026 - 11:21
 0  186
अशा नावांची फक्त चर्चा

विजयकुमार पिसे 

१९९७ मध्ये सुभाषबापू स्था.स्व.सं. विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार होते. *माझ्या टीम सोबत मार्डीचे दोन कार्यकर्ते. यापैकी एक तरुण शहाजी पवार होते. या निवडणुकीत बापूंनी चमत्कार केला. पुढे २००४, २००९ (माढा लोकसभा व तुळजापूर विधानसभा) २०१४,२०१९ या सर्व निवडणुकांत शहाजीभाऊ बापूंसोबत सावलीसारखे उभे. पुढे भाऊ जिल्हाध्यक्षपद गाजविले. २०१९ लोकसभा निवडणुकीत निवडणूक प्रमुख विजय देशमुख मालकांना सहाय्यक. बाहुबली काँग्रेस नेत्यांच्या संघर्षातून भाजपाला विजय मिळवून देणारे असे खपलेले असंख्य कार्यकर्ते. म्हणजे ..आम्ही असू आम्ही पत्थर पायातील... पण जेव्हा संधी चालून येते, तेव्हा कळसावर आज *नवी भाजपाला भाऊसारखे कार्यकर्ते आठवणार नाहीत?
नुकत्याच एका कार्यक्रमात पालकमंत्र्यांबरोबर शहाजीभाऊ दिसले, एमएलसीबाबत पत्रकारांनी प्रश्‍न केला. भाऊंनी फक्त हात जोडले. इच्छुकांच्या चर्चेत अनेक नावं आहेत. यापैक़ी(निंबाळकर,परिचारक,सातपुते) काही खासदार, आमदार झाले,पदं भोगली. त्यांना विधानसभा आणि सोलापूर (विनाकारण) लोकसभेत संधी वाया घालवली. काँग्रेसचे *माने व राष्ट्रवादी *अनगरकर या अशा नावानंतर अगदी शेवटी भाऊचं नाव चर्चेत येतं. भाऊंची आणखी एक ओळख म्हणजे मोदी जॅकेट! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शहाजी भाऊंची हमखास आठवण सांगतात. नेत्यांच्या इतकं जवळ असूनही महाराष्ट्रीयन *नवी भाजप खर्‍या कार्यकर्त्यांनाच हमखास विसरतं. दरेकर,पडळकर,वाघ अशा अनेकांचे *लाड भाजपाने पुरवून मागल्या दारानं त्यांना विधान परिषदेत संधी दिली. भाजपाकडे नावात आणि कामातही पॉवर भाऊ आहेत. त्यांची फक्त चर्चा होते. येरे माझ्या मागल्या..! प्रत्येक वेळी...

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow