यांचाच डाव खरा
भाजपातील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपेक्षा आणि दलबदलू नेत्यांची वाढती चलती यावर भाष्य करणारा राजकीय लेख. विक्रम देशमुख, डावखरे आणि संघटनात्मक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर “नवी भाजपा”च्या बदलत्या संस्कृतीवर सवाल.
विजयकुमार पिसे
अनेक दलबदलू यांची नवी भाजपात चलती आहे. अशा एका स्वयंमॅनेजमेंट गुरूची टॅगलाईन पहायला मिळाली, .... ही नवी भाजपा आहे. नवी भाजपा म्हणजे? सत्ता,खुर्ची,पदं,लाभ. सारं काही आमच्यासाठी. आम्ही आणि मी. लिमीटेड कं. काँग्रेसी, एनसीपी, सेनेतून आलेले सत्तालोभी दलबदलू *नवी भाजपावर कब्जा करू पाहताहेत. त्यामुळे माधव भांडारी असो वा केशव उपाध्ये. यांनी फक्त सतरंज्या... एमएलसीसाठी ज्या काही नावांची चर्चा होते व पुढे ज्यांना संधी मिळते. तिथेदेखील नवी भाजपाच *डाव साधणार असं दिसतंय.
विक्रम देशमुख, रोहिणी तडवळकर यांच्या वाडवडिलांनी जनसंघापासून खस्ता खाल्ल्या. यांनी मात्र दावा करायचा नाही. ना पद.ना तिकीट.ना संधी. आयत्या बिळावर आलेल्यांसाठीच त्यांनी झटायचं. आठवड्यापूर्वी विक्रम देशमुख यांची प.महाराष्ट्र संघटन सहसंयोजकपदी वर्णी लागली. ठाण्याचे आ.निरंजन डावखरे मुख्य समन्वयक. अनुभवी, कुशल संघटक आणि निष्ठावंत विक्रम देशमुख यांच्याऐवजी डावखरेना संधी. पवारनिष्ठ वसंत डावखरे यांचे हे आमदारपुत्र. 2018 मध्ये एनसीपीचा राजीनामा देऊन निरंजन डावखरे भाजपावासी झाले. ठाणेकर पक्ष प्रमुखांचे ठाण्यावरच प्रेम. डावखरेंची आवश्यकता कोकण/ठाणे पट्ट्यात. पण ठाणेकरांचे लक्ष पश्चिम महाराष्ट्रात. म्हणून ही सोय. पक्ष संघटक,समन्वयक म्हणून विक्रम देशमुख केव्हाही सरस. निवडणूक कोणतीही असो. आणि उमेदवार वसुंधरा राजे (राजस्थान) असो वा स्मृती इराणी (अमेठी). तिथे विक्रम देशमुखांचेच मॅनेजमेंट चालणार.
मात्र एमएलसी आमदारकी वा पद. तेव्हा फडणवीस यांच्या युवा मोर्चा टीममधील त्यांचे जुने/उजवे सहकारी विक्रम देशमुख यांना डावलून डावखरेंचेच कल्याण होणार. ही नवी भाजपाची रितभात.
What's Your Reaction?