फुकरे..

फडणवीस सरकारसमोर आरक्षण, उपवर्गीकरण, आदिवासी-धनगर समाजाच्या भावना, एमपीएससी पेपरफुटी, विद्यार्थ्यांचा असंतोष आणि संभाव्य दुष्काळ यांसारखी अनेक आव्हाने असताना भाजपातील काही नेते विरोधकांच्या पक्षांतर्गत राजकारणावर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याची टीका या लेखातून करण्यात आली आहे. आमदार परिणय फुके यांनी रोहित पवार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे केलेले विधान आणि त्यावर पवार कुटुंबीयांकडून झालेल्या पलटवाराचा संदर्भ घेत, आधी ‘आपले घर’ सांभाळण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

Sep 11, 2026 - 12:29
 0  1
फुकरे..

आपल्या प्रिय नेत्यावर अतिप्रेम दाखवण्याचा नाद खुळा ठरतोय, अशी अवस्था काही नेत्यांची होते. शरद पवार, सुप्रिया ताई, रोहित पवार यांच्या पक्षाची नाहक चिंता आपण का करायची. जंतर मंतर आंदोलन, राज्यात उपवर्गीकरणावरून मागास समाजाचे निघणारे मोर्चे, आदिवासी आणि धनगर समाजाच्या तीव्र भावना, एमपीएससी पेपर फुटीची साखळी, विद्यार्थ्यांमध्ये असंतोष, आरक्षण, संभाव्य दुष्काळ अशा अनेक समस्यांवर फडणवीस सरकारला तोंड द्यावे लागत आहे. पुण्यात परिवाराच्या समन्वय बैठकीत या सार्‍या समस्यांवर, प्रश्‍नांवर आपल्याला काम करायचं आहे, याची जाणीव करून देेताना *"डर अच्छा लगता है।" हे विधान म्हणजे सत्ताधार्‍यांसाठी धोक्याचा इशारा होय.
   पण नेत्यांवर प्रेम दाखवण्याच्या नादात तोल सुटल्यामुळे भाजपातील काही (आम. व मंत्री) सरदार बेताल होत आहेत. आ.परिणय फुके यांनाही असा मोह आवरला नाही. रोहित पवार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असं विधान करून स्वत:चं हसे करून घेतलेच. त्यानंतर रोहित आणि सुप्रियाताईंनी आ.परिणय फुकेंचा लोचा केला.  त्यांचे वस्त्रहरण करताना पार वाळूचे ठेके घेण्यापर्यंत ठोकून काढले. पवार आणि काँग्रेस यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत मामला. आपलं घर ठीक करण्याचं सोडून कुठेही "फुकरे" करायला निघाले तर पोळलेल्या तोंडावर "फूंक" मारण्याची वेळ आली नाही म्हणजे पुरे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow