दुष्काळ आवडे...

नांदेडच्या दुष्काळी आढावा बैठकीचा व्हिडिओ व्हायरल; ‘दुष्काळ आवडे सर्वांना...’ प्रशासनाच्या तयारीवरही सवाल

Sep 21, 2026 - 18:03
 0  32
दुष्काळ आवडे...

यंदा पावसाने ओढ धरल्यामुळे दुष्काळ अटळच आहे. दुष्काळाचा सांगावा गतवर्षीच हवामान खात्याच्या अंदाजातून स्पष्ट होता. त्यामुळे तशी तजवीज तेव्हापासूनच अपेक्षित होती. म्हणजे संभाव्य उपाययोजना. पाऊस माघारल्यानंतर प्रशासन आणि मंत्री दुष्काळ पाहणी दौर्‍यावर निघालेत. वरातीमागून घोडे.. नांदेड येथे दुष्काळी आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींसाठी काजू-बदामाचा बेत होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. बैठकीत काजू बदामाची व्यवस्था.. यात वावगं काय? कारण दुष्काळ आवडे सर्वांना...

    राज्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि आढावा घेण्यासाठी आलेले राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये पार पडलेली बैठक याच वादामुळे चर्चेत आली आहे. दुष्काळी परिस्थितीवर गंभीर चर्चा होणे अपेक्षित असताना, बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी टेबलवर ठेवलेल्या काजू आणि बदामांवर मारलेला डल्ला कॅमेर्‍यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

   एकीकडे दुष्काळाची दाहक परिस्थिती, पिकं करपून गेलेली. शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रू. मदत कधी मिळणार याची प्रतीक्षा आणि अपेक्षा. दुसरीकडे लोकप्रतिनिधींना दुष्काळी आढावा बैठकीत काजू बदामची मेजवानी ठेवल्याचे चित्र. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये याचा संताप आहेच. दुष्काळ, आपत्ती हे संकट आहेच. पण या काळात प्रशासन, लोकप्रतिनिधी सोयीनुसार भूमिका बजावून कार्यभाग साधतात. एक ताजे उदा. एका शेतकर्‍याने दुष्काळसंदर्भात चारा छावणीची मागणी न करता, चारा छावणीचे अनुदान थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली. तसेच टँकर किती, याची तर गणतीच नसते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना हवाय दुष्काळ.. यानिमित्ताने दुष्काळी योजना लाटता येईल. बिनबोभाट.....!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow