वाघनाथ अनाथ...

मनोज जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनातील भूमिकेवरून यापूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चा रंगल्या. विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेतल्यानंतर आता जरांगे यांच्या वक्तव्यांचा रोख बदलल्याचे दिसत असून, त्यांनी एकनाथ शिंदे यांना थेट इशारा दिला आहे. या बदललेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, जरांगे यांच्या ‘यू-टर्न’चा राजकीय फायदा-तोटा कोणाला होणार, याकडे लक्ष लागले आहे.

Sep 11, 2026 - 12:27
 0  3
वाघनाथ अनाथ...

एकनाथ शिंदे यांना अनुकूल जरांगेचे आरक्षण आंदोलन आहे. त्यामुळेे फडणवीसांचा एकेरी उल्लेख, विधानसभा निवडणुकीत भाजपाला घेरण्याची व्यूहरचना, संदीपान भुमरे यांचा लोकसभेतील विजय यापैकी अनेक घडामोडी पडद्याआडही आणि आमने सामनेही  झाल्या. विधानसभा निवडणुकीत भाजपला पाडण्याची भाषा झाली, पण डाव उलटला. त्यानंतरही फडणवीस लक्ष्य होतेच. आता अचानक "यू टर्न" कसा काय? असा प्रश्‍न अनेकांना पडला असेल. 
आता त्या पलीकडची पायरी गाठली आणि एकनाथ शिंदे यांना "अनाथ" करण्याची तयारीही झाली असे दिसते. जरांगे यांनी थेट आव्हान दिलंय, 'एका फटक्यात संपाल', बापरे.. हे फारच जालीम दिसतंय. मराठ्यांना मराठ्यांच्या अंगावर सोडत असाल तर तुम्ही खूप लवकर संपाल, असा थेट इशाराच जरांगे यांनी दिला आहे. 
  गेल्या आठवड्यापासून जरांगेंचा रोख बदललेला दिसला. फडणवीसांना अडचणीत आणण्याचा शिंदे सेनेचा कट, मराठ्यांवर हल्ला करण्याचा सेना मंत्र्यांचा डाव ही गुपितं फुटलीत. फडणवीस एकेरीवर आणि भाजपाला पाडण्याची भाषा, इतकंच नव्हे तर मुस्लिम धर्मगुरूंशी दोस्तानाही तेव्हा (2024) दिसला. तेव्हा हे गुपित असलं तरी राज्यातील जनतेला 'बटेन्गे तो...' कळून चुकलं होतं, म्हणून त्यांनी ही चूक एव्हीएममध्ये केली नाही. अर्थात याला कारण फडणवीसांचं नेक धोरण. असो. "सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही"  हे समोर आहे. पण आता त्यामुळे सेनेचे 'नाथ  अनाथ' होणार तर नाही ना?

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow