श्रावण मासानिमित्त श्री रेवणसिद्धेश्‍वर महाराज पालखी व रथोत्सवाची सांगता

हत्तीवर जगद्गुरु रेवणसिद्धेश्‍वर महाराजांची जिवंत प्रतिकृती साकारली. अनेक मान्यवरांचा रथोत्सव पालखी सोहळ्यात सहभाग

Sep 11, 2026 - 12:05
 0  3
श्रावण मासानिमित्त श्री रेवणसिद्धेश्‍वर महाराज पालखी व रथोत्सवाची सांगता

सोलापूर : श्रावण महिन्यामध्ये निघणार्‍या जगद्गुरु श्री रेवणसिद्धेश्‍वर महाराजांची पालखी व रथोत्सवाची मोठ्या भक्तीभावाने सांगता झाली. याप्रसंगी खा. ज्योती वाघमारे, विहिंपचे प्रांत अध्यक्ष प्रा.गजानन धरणे, नगरसेवक प्रियदर्शन साठे यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले.
पारंपरिक वाद्य वाजवत ही मिरवणूक जोडभावी पेठ चिद्रे वाडा येथून, कुंभारवेस, मंगळवार पेठ,मधला मारुती,आजोबा गणपती, विजापूर वेस, गुरु भेट, सात रस्ता मार्गे विजापूर रोड येथील रेवणसिद्धेश्‍वर मंदिरात दाखल झाली. तिथे महाआरती नंतर महाप्रसादाचे वाटप झाले. सायंकाळी श्री गुरुभेट मंदिर येथून रथाची मिरवणूक मोठ्या थाटात निघाली याप्रसंगी मिरवणुकीत हत्तीवर जगद्गुरु रेवणसिद्धेश्‍वर महाराजांची जिवंत प्रतिकृती साकारण्यात आली होती. 
    उदय चाकोते, सुदीप चाकोते, राजशेखर हिरेहब्बू,नरेंद्र गंभीरे, निलेश ठोकडे, सिद्धेश्‍वर मुनाळे, शिवराज म्हेत्रे, दिपक आर्वे, बसवराज,  मनीष काळजे यांच्या हस्ते रथाचे पूजन झाले.  याप्रसंगी रेवणसिद्धेश्‍वर समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष गंगाधर यादवाड,गिरमलप्पा हिंगमिरे,सिद्धेश्‍वर दुलंगे, अशोक चाकोते, राजशेखर दुलंगे, शिवानंद ख्याडे, अ‍ॅड मल्लिनाथ राचेटी, बसवराज हिंगमिरे, सागर अतनुरे, आशिष दुलंगे, मल्लिनाथ सोलापुरे, गुरुराज पदमगोंडा, सतीश परेल्ली, आनंद खटके, केतन वारद, शिवानंद सुलतानपुरे,भागेश ख्याडे, चिदानंद बगले, रोहित बिद्री, ऋषिकेश हिंगमिरे, बबलू परचंडे, शीतल निकम, बसवराज काटगावकर, अध्यक्ष श्रीशैल जकापुरे, सुरज कोरे, शरण बिराजदार, बसवराज आवटी, सुरेश धनश्री, मंथन चिडगुंपी, ऋतुराज वाघमोडे, संकेत अल्लोळी, शुभम वडतीले, अभिजित तांडूरे, ऋषभ चारी, मल्लिकार्जुन करजगी, रामचंद्र हिंगमिरे, वरद होमकर,योगीनाथ हुबळीमठ,शशांक दुलंगे, ओंकार हवले,प्रशांत राऊर आदी अनेक मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow