यमगरवाडी येथे कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान

यमगरवाडी येथे कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान

Jan 3, 2026 - 12:41
 0  159
यमगरवाडी येथे कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान

(विजयकुमार पिसे) 
तुळजापूर/यमगरवाडी : भटके विमुक्त विकास परिषदेच्या कार्यकर्त्याच्या अथक प्रयत्नामुळे भटक्या समाजातील वर्षानुवर्षे खितपत पडलेले प्रश्‍न प्रशासन अन सरकारपुढे उजेडात आणल्यामुळे मार्गी लागले आहेत. शासनाचे भटके विमुक्त समाजाकडे लक्ष गेले आहे. भटके विमुक्तांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्‍नांमधून   यमगरवाडीचा सेवा प्रकल्प उभा राहिला. व यशस्वीपणे भटके विमुक्तांच्या  सामाजिक व शिक्षणात आज काम करत आहे. इथे शिक्षण स्वावलंबन अन सन्मान विद्यार्थ्याना मिळतोय हे समाजाच्या प्रगतीच द्योतक होय. यमगरवाडी प्रकल्पामुळे भटके विमुक्तांमध्ये सामाजिक परिवर्तन होत आहे, असे गौरवोद्गार रा.स्व.संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य सुरेश तथा भैय्याजी जोशी यांनी काढले .भटके विमुक्त  विकास परिषद, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान  महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित सन्मान कार्यकर्तृत्वाचा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी प्रात संघचालक अनिल भालेराव, प्रमुख उपस्थिती भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उध्ववराव काळे होते.भैय्याजी जोशी पुढे म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुशीत वाढलेल्या कार्यकर्त्याचे काम अभिमानास्पद आहे .भटक्या विमुक्त समाजाला समाज जीवनाच्या प्रवाहात आणून त्यांचा संर्वागीण  विकास साधण्यासाठी 32 वर्षापासून कार्यरत आहे .त्यामुळे समाजाचे प्रश्‍न शासन दरबारी पोहोचल.े ते मार्गी लावण्यात यश आले. त्यामुळे यमगरवाडीच्या माळरानावर भटक्या विद्यार्थ्यासाठी सेवा प्रकल्प डोलतोय हे प्रगतीचे द्योेतक आहे. कार्यकर्त्यानी त्याग अन समर्पित भावनेने हाती घेतलेल्या कार्याला यश आले. असेच कार्य  चालू राहील असे जोशी यानी सांगीतले.


या कार्यक्रमास भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे डॉ. संजय पुरी, अ‍ॅड.प्रदीप सिंग राजपूत, डॉ.प्रणिता गडेकर, अशोक संकलेचा, नाना शिर्के, अभय कुलकर्णी, नरेश पोटे, संघटन मंत्री राहुल चव्हाण, जिल्हा संघचालक अ‍ॅड.रवींद्र कदम, जिल्हा कार्यवाह जानराव सर, सुशील कुलकर्णी, मदन मोरे,बाळासाहेब चौधरी, नरसिंग झरे, संजय तांबट, शुभांगी तांबट पुणे, शेखर पाटील,डॉ.अविनाश ढगे, पत्रकार देविदास पाठक, अनिल आगलावे ,संतोष मगर,साहेबराव घुगे ,विजय गिजरे,विठ्ठल म्हेत्रे ,आण्णासाहेब कोल्हटकर , यमगरवाडीतील कर्मचारी विद्यार्थी यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते . या कार्यक्रमास बहुसंख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे,  सूत्रसंचालन आण्णासाहेब मगर, अनिल घुगे तर आभार भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह विवेक अयाचित यांनी मानले.


या मान्यवरांचा झाला सन्मान...
वैजीनाथ आप्पा लातुरे, पद्मश्री भिकुजी तथा दादा इदाते, पद्मश्री गिरीश प्रभुणे, महादेव गायकवाड, उपाध्यक्ष,डॉ अभय शहापूरकर,  डॉ राघवेंद्र डंबळ, चंद्रकांत गडेकर, रावसाहेब कुलकर्णी,आनंद काळे ,रघुवीर ओक, सुशीला ओक, सुरेश पवार, कुसुम पवार ,तेजा कुलकर्णी आदीचा भटके विमुक्त परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला,  भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह आभार विवेक अयाचित यांनी मांनले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow