मालेगावमध्ये बालक यज्ञाच्या अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

मालेगावमध्ये बालक यज्ञाच्या अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

Nov 23, 2025 - 00:42
 0  29
मालेगावमध्ये बालक यज्ञाच्या अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

सोलापूर  - नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळी भागात साडेतीन वर्षांच्या यज्ञा या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या जघन्य गुन्ह्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने मालेगावच्या पार्क चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान संतप्त महिलांनी आरोपी खैरनारच्या फोटोवर दगडांनी ठेचून तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर मेणबत्ती प्रज्वलित करून आरोपीचा फोटो जाळत महिलांनी संताप व्यक्त केला. परिसरात “यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे”, “बलात्कार्यांना फाशी द्या” अशा घोषणांनी वातावरण संतप्त झाले. 

संभाजी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष मीनल दास  यांनी माध्यमांशी बोलताना हातात मेणबत्ती घेऊन संताप व्यक्त करत सांगितले की,  “आतापासून कुठेही महिला किंवा लहान मुलींवर अत्याचार झाला, तर फक्त कॅन्डल मार्च करणारे दिवस गेले. न्यायव्यवस्था आरोपींना तात्काळ फाशी देणार नसेल, तर त्या आरोपीला सरळ पीडित कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात यावे. कुटुंबीयच ठरवतील त्याचं काय करायचं.”

या आंदोलनात संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा आणि शहर विभागातील अनेक पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले,  महिला जिल्हाध्यक्ष मीनल रास,  वकील आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश कदम,  जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, शहर व जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे, शहर कार्याध्यक्ष सतीश वावरे,  शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे,   बबन  माने, जिल्हा उपाध्यक्ष संजीवनी सलबत्ते,  शहराध्यक्ष मनीषा कोळी, पूजा कलागाते, राधा घुले, सुनंदा सूर्यवंशी, सुनिता कारंडे, गीता अंजीखाने, विद्या देशमुख, मनीषा डोंगरे, संगीता डोंगरे, सविता मिरगाळे, सिद्धावा हत्यानुर, लक्ष्मी किरंगी आदींचा समावेश होता. परिसरातील अनेक नागरीकांनाही या आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.
 निरागस बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे समाजात प्रचंड संतापाची लाट असून आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी एकमुखाने मागणी व्यक्त करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow