निष्ठा हाच एकमेव निकष! नरोटे,शटगार यांचे काँग्रेस अध्यक्षपद कायम

बदलापूर मागणीला श्रेष्ठींचा धक्का, पदासाठी दावा अनेक, पण निष्ठावंतच नेक

May 21, 2026 - 00:43
May 21, 2026 - 00:51
 0  4
निष्ठा हाच एकमेव निकष! नरोटे,शटगार यांचे काँग्रेस अध्यक्षपद कायम

(विजयकुमार पिसे)
  पद एक दावेदार अनेक. सर्वच राजकीय पक्षांचे चित्र. पार्टी विथ.. प्रतिमा जपण्याचे आव्हान पडत्या काळात जे पक्षनिष्ठ राहिले, त्यांनाच संधी. सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदासाठी बदलाचे दावे असतानाही पक्षश्रेष्ठींनी चेतन नरोटे आणि सातलिंग शटगार सर (अक्कलकोट) यांना 'बी कंटीन्यू' केले आहे.
सव्वाशे वर्ष पार झालेली काँग्रेस आता मुक्त झाली पाहिजेे, अशी चर्चा अधूनमधून होत असते. कारण येथे सगळेच नेते, कार्यकर्ते कमी. हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर हे समीकरण बदलण्याचा प्रयत्न आहे. सोलापूऱ शहर व जिल्हा अध्यक्षपदासाठी नुकत्याच झालेल्या मुलाखतीप्रसंगी पक्षात सक्रिय नसलेल्या काही नेत्यांनी बदलापूरची हाकाटी केली. खा.प्रणिती शिंदे यांनाच धुरा सोपवा अशी अचाट मागणीही काही जणांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मनपा व जि.प.पं.स. आणि न.पा. निवडणुकीत काँग्रेस सपाटून मार खाल्ल्यामुळे अभी नही तो कभी नही, अशी राळ उडवणार्‍यांना त्यांची जागा दाखवून पक्षश्रेष्ठींनी सोलापूऱ शहरात चेतन नरोटे आणि ग्रामीण (पूर्व)सातलिंग शटगार या विद्यमान अध्यक्षांना कायम केले आहे.   
    स्थानिक पातळीवर बदलापूर मागणीला धक्का देत पदासाठी अनेकांनी दावा केला तरी निष्ठावंतच नेक हे समीकरण प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी परफेक्ट केले आहे. शिवाय त्यांनी जी यादी केंद्रीय समितीकडे पाठविली, तीच त्यांनी ग्राह्य धरल्यामुळे केंद्र,राज्य आणि स्थानिक पातळीवर योग्य तो एकच संदेश गेला आहे. चेतन नरोटे १९९७ पासून नॉनस्टॉप नगरसेवक असून स्थायी समिती सभापती, गटनेते अशा जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या आहेत. १९९७ मध्ये अपक्ष निवडून आल्यानंतर नरोटे यांना भाजपाची मोठी ऑफर होती, त्यासाठी अटीतटीचे प्रयत्न झाले. काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांना अध्यक्षपदाची धुरा सोपविली. दुसर्‍यांदा पुन्हा ही संधी कायम ठेवून नेत्यांनी आणि पक्षानेही नरोटे यांच्यावर विश्‍वास व्यक्त केला आहे.
    ...शटगार यांची स्वच्छ प्रतिमा
    अक्कलकोट तालुक्यातील सलगरचे रहिवासी सातलिंग शटगार (सर) माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे समर्थक. म्हेत्रे कधी भाजपा,कधी सेना या झटापटीत त्यांनी पंजा सोडून हाती धनुष्यबाण घेतले. तेव्हा तालुक्यातील अनेक म्हेत्रे समर्थकांनी काँग्रेसचा पंजा सोडला नाही. यापैकी एक सातलिंग शटगार. उच्च विद्याविभूषित आणि स्वच्छ प्रतिमा असलेले शटगार सर शिक्षक,मुख्याध्यापक,प्राचार्य म्हणून कार्यरत होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला यश मिळाले नाही. म्हणून त्यांना डावलले नाही. निष्ठा हाच एकमेव निकष शटगार यांना कामी आला आहे.

नवनिर्वाचित पदाधिकारी 

  • अहिल्यानगर सिटी – श्री दीप चव्हाण
  • अहिल्यानगर ग्रामीण उत्तर – श्री गुजर सचिन रंगाराव
  • अहिल्यानगर ग्रामीण दक्षिण – श्री किरण अण्णासाहेब पाटील
  • अकोला सिटी – श्री महेंद्र गवई
  • अकोला ग्रामीण – श्री प्रकाश तयाडे
  • अमरावती सिटी – श्री बाबलू उर्फ नितीराज शेखावत
  • बीड – श्री राहुल पुरुषोत्तम सोनवणे
  • भंडारा – श्री मुकुंद विनोद साखरखर
  • भिवंडी सिटी – श्री आबिद खान मुन्सफ
  • बुलढाणा – श्री प्रकाश रामभान आओचार
  • चंद्रपूर सिटी – श्री शिवा राव पोलिसेट्टी
  • चंद्रपूर ग्रामीण – श्री सुभाष रामचंद्रराव धोटे
  • छत्रपती संभाजीनगर सिटी – श्री सय्यद अकरम सय्यद अब्बास
  • छत्रपती संभाजीनगर ग्रामीण – श्री किरण अशोकराव पाटील
  • धाराशिव – श्री उमेश राजेनिंबाळकर
  • धुळे सिटी – श्री खान मोहम्मद साबीर
  • धुळे ग्रामीण – श्री करनकाळ युवराज किशनराव
  • डोंबिवली सिटी – श्री अमित भास्कर म्हात्रे
  • गडचिरोली – श्री विश्वजित मरोत्रा कोवासे
  • गोंदिया – श्री अमर वारेडे
  • हिंगोली – डॉ. सतीश यशवंतराव पाचपुते
  • इचलकरंजी सिटी – श्री संजय महादेव कांबळे
  • जळगाव सिटी – श्री जान नेल शेख
  • जळगाव ग्रामीण पूर्व – श्री धनंजय शिरीष चौधरी
  • जळगाव ग्रामीण पश्चिम – श्री अविनाश भालेराव
  • जालना सिटी – डॉ. विशाल धनुरे
  • जालना ग्रामीण – श्री कल्याण दळे
  • कल्याण सिटी – श्री नवीन सिंह
  • कोल्हापूर सिटी – श्री प्रवीण एल. केसारकर
  • कोल्हापूर ग्रामीण – श्री सतेज बंटी पाटील
  • लातूर सिटी – डॉ. शिवाजी नरसिंगराव जावडेकर
  • लातूर ग्रामीण – श्री अभय साळुंखे
  • मीरा भाईंदर सिटी – श्री राकेश राजपुरोहित
  • नागपूर सिटी – श्री प्रफुल्ल विनोदराव गुढधे
  • नांदेड सिटी – श्री अब्दुल गफ्फार
  • नांदेड ग्रामीण उत्तर – डॉ. विठ्ठल गंगाधर पावडे
  • नांदेड ग्रामीण दक्षिण – श्री रविंद्र वसंतराव चव्हाण
  • नंदुरबार – श्री दीपक रमणभाई पटेल
  • नाशिक सिटी – श्री निलेश अर्जुन खैरे (बबलू खैरे)
  • नाशिक ग्रामीण उत्तर – श्री रमेश जमरू काहंडोळे
  • नाशिक ग्रामीण दक्षिण – श्री भारत शंकर टाकेकर
  • नवी मुंबई सिटी – श्री रामचंद्र धर्माजी दळवी
  • पालघर – कॅप्टन सत्याम बी. ठाकूर
  • पनवेल सिटी – डॉ. श्रुती शाम म्हात्रे
  • परभणी सिटी – श्री रविराज अशोकराव देशमुख
  • परभणी ग्रामीण – श्री अब्दुल्ला खान दुर्रानी (बाबाजानी)
  • पिंपरी चिंचवड सिटी – श्री नरेंद्र रामदास बनसोडे
  • पुणे सिटी पूर्व – श्री प्रशांत जगताप
  • पुणे सिटी पश्चिम – सौ. दीप्ती चौधरी
  • पुणे ग्रामीण उत्तर – श्री कमलाकर गुलाबराव सातव
  • पुणे ग्रामीण दक्षिण – श्री लहू निवृत्ती निवंगुणे
  • रायगड उत्तर – डॉ. मनीष अनंत पाटील
  • रायगड दक्षिण – श्री राजेंद्र मधुकर ठाकूर (राजा भाऊ)
  • रत्नागिरी उत्तर – सौ. सोनलक्ष्मी वीरधवल घाग
  • रत्नागिरी दक्षिण – श्री जमीर खलिफे
  • सांगली ग्रामीण – श्री विक्रमसिंह बाळासाहेब सावंत
  • सांगली-मिरज-कुपवाड सिटी – श्री राजेश विठ्ठल नाईक
  • सातारा – श्री नामदेव काशिनाथ पाटील
  • सिंधुदुर्ग – श्री अरविंद नामदेव मोंडकर
  • सोलापूर सिटी – श्री चेतन नारोटे
  • सोलापूर ग्रामीण पूर्व – श्री शतगार सटलिंग अण्णाराव
  • सोलापूर ग्रामीण पश्चिम – श्री संदीप बसंतराव साठे
  • ठाणे सिटी – श्री राहुल करबारी पिंगळे
  • ठाणे ग्रामीण – श्री चेतनसिंह एच. पवार
  • उल्हासनगर सिटी – श्री रोहित चंद्रकांत साळवे
  • वसई-विरार सिटी – कॅप्टन निलेश अशोक पेंढारी
  • वर्धा – श्री सुनील कोठे
  • वाशीम – श्री विठ्ठल पांडुरंग चौधरी
  • यवतमाळ – श्री सचिन विश्वासराव नाईक

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow