साेलापूर तरुण भारतच्या अध्यक्षपदी राम तडवळकर
एकमताने निवड; मावळते अध्यक्ष विवेक घळसासी यांच्या अध्यक्षखाली पार पडली बैठक
साेलापूर : साेलापूर तरुण भारत मिडिया लि.च्या नूतन अध्यक्षपदी रामचंद्र तडवळकर यांची एकमताने निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष निरुपणकार विवेक घळसासी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही घाेषणा करण्यात आली.
साेलापूर तरुण भारत कार्यालयात साेमवार, दि.2 नाेव्हेंबर 2026 राेजी श्री. घळसासी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत निवड झालेले संचालक पुढीलप्रमाणे : कार्यकारी संचालक दिलीप पेठे, सर्वश्री संचालक सुनील कुलकर्णी, संताेष सरदेशमुख (कुलकर्णी), आनंद खंडेलवाल, ज्ञानेश्वर म्याकल. याप्रसंगी प्रकाशक दिलीप दुलंगे, मुख्य संपादक प्रशांत माने, सीईओ बी. श्रीनिवास हे उपस्थित हाेते. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या बैठकीत तरुण भारतच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला.
मावळते अध्यक्ष निरुपणकार विवेक घळसासी यांचा सन्मान नूतन अध्यक्ष रामचंद्र तडवळकर यांच्या हस्ते करण्यात आला. तर नूतन अध्यक्ष रामचंद्र तडवळकर यांचा सन्मान निरुपणकार विवेक घळसासी यांच्या हस्ते करण्यात आला. नूतन संचालक श्री. कुलकर्णी, श्री. सरदेशमुख, श्री. खंडेलवाल, श्री. म्याकल यांचा सन्मान निरुपणकार विवेक घळसासी यांच्या हस्ते करण्यात आला.
समर्थ सहकारी बँकेच्या संचालकपदी नव्याने निवड झालेले श्री. दिलीप दुलंगे यांचा सन्मान श्री. घळसासी यांच्या हस्ते करण्यात आला. तरुण भारतला प्रगतीच्या वाटेवर आणखी उंचीवर नेण्याचा संकल्प याप्रसंगी सर्वांनी केला.
What's Your Reaction?