२० बेघराना आपुलकी निवारा केंद्रात आश्रय; श्रीदेवी फुलारेचा पुढाकार

सोलापुरात भाजप नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 20 बेघर व्यक्तींना ‘आपुलकी’ निवारा केंद्रात सुरक्षित आश्रय देण्यात आला. उर्वरित बेघरांसाठीही शोध मोहीम सुरू राहणार.

Jul 4, 2026 - 22:02
 0  1
२० बेघराना आपुलकी निवारा केंद्रात आश्रय; श्रीदेवी फुलारेचा  पुढाकार

सोलापूर: भाजप नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली बेघरांसाठी शोध मोहीम राबवून 20 बेघर व्यक्तींना आपुलकी निवारा केंद्रात आश्रय देण्यात आला.
   महानगरपालिका, आपुलकी बेघर निवारा केंद्र, जय भारत माता सेवाभिवृद्धी संस्था आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बेघर व्यक्तींची विशेष शोध मोहीम राबविली. सिद्धेश्वर मंदिर परिसर, दर्गाह परिसर, मशीद परिसर, जिल्हा परिषद, पासपोर्ट कार्यालय, होम मैदान आणि स्मार्ट सिटी परिसरात या मोहिमेदरम्यान 20 बेघर व्यक्ती आढळून आल्या. त्यांची नोंद घेऊन, आपुलकी बेघर निवारा केंद्र, जिल्हा क्रीडा संकुलामागे, कुमठा नाका, सोलापूर इथे सुरक्षित निवारा, राहण्याची व्यवस्था आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आपुलकी बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक अशोक वाघमारे,पालिकेचे समूह संघटक वसीम शेख, सत्यजित वडावराव, साईप्रसाद पोळ, अरविंद महाले, राघवेंद्र बोरगावकर, सुनीता म्हस्के, धर्मा कांबळे, दिलशाद शेख आदींनी परिश्रम घेतले. 


    शहरातील डफरीन चौक सिग्नलजवळ, रेल्वे स्टेशन, सिव्हिल हॉस्पिटल परिसर आणि इतर भागात आजही बेघर व्यक्ती आढळून येतात. त्यांनाही आसरा मिळण्यासाठी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी  लक्ष घातले आहे. जोपर्यंत सोलापुरातील सर्व बेघर व्यक्तींना आपुलकी निवारा केंद्रात आश्रय मिळत नाही, तोपर्यंत आपणही बेघर महिलांसोबत रस्त्यावर झोपून अनोखं आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow