खालिद का शिवाजी" चित्रपट वादग्रस्त, विहिंप आक्रमक, प्रदर्शनास तात्काळ बंदीची आग्रही मागणी

खालिद का शिवाजी" चित्रपट वादग्रस्त, विहिंप आक्रमक, प्रदर्शनास तात्काळ बंदीची आग्रही मागणी, छत्रपती शिवरायांविषयी विकृत इतिहासाची मांडणी

Aug 7, 2025 - 13:37
 0  353
खालिद का शिवाजी" चित्रपट वादग्रस्त, विहिंप आक्रमक, प्रदर्शनास तात्काळ बंदीची आग्रही मागणी

(विजयकुमार पिसे) 

इतिहासाचे विपर्यास्त करणारा वादग्रस्त "खालिद का शिवाजी" या चित्रपटाच्या प्रदर्शनास शासनाने प्रतिबंध करावा, अशी मागणी विश्‍व हिंदू परिषदेने केली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक खोटे आणि अनैतिहासिक दावे करण्यात आले आहेत. शिवरायांचा विकृत इतिहास मांडण्यात आला आहे, याकडे विहिंपने लक्ष वेधले आहे.

    तसेच विहिंपने उदाहरणादाखल काही संदर्भही दिले आहेत.1)छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान होते.2)त्यांच्या अंगरक्षकांपैकी 11 मुसलमान होते.3)त्यांनी रायगड किल्ल्यावर मशिद बांधली.4) तसेच चित्रपटाच्या शीर्षकात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा (खालिद का शिवाजी) असा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, याकडेही विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष वेधले आहे. यासंदर्भात प.महाराष्ट्र प्रांत विहिंपने काही आग्रही मागण्याही केल्या असून सर्व जिल्ह्यात सदर खालिद का शिवाजी या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासंबंधी जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृह चालकांना सूचना द्याव्यात, चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक, प्रसारमाध्यमे तसेच हा चित्रपट परदेशी पाठवून शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्यात सामील असलेले सर्व ज्युरी, अधिकारी, मंत्री तसेच अन्य संबंधितांवर अफवा पसरवणे, अपप्रचार करणे, धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक स्थळांबाबत अपप्रचार करणे या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, असे प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी नमूद केले आहे.

   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदरी मोठ्या प्रमाणात मुस्लीम अधिक़ारी व सैन्य होते, हे धांदात खोटे आहे. यातूनच काही ठिकाणी ब्रिगेडी विचार हिंदू समाजात रूढ करण्याचा प्रयत्न आहे. सर्वधर्म समभाव हा सेक्युलर विचार अर्थात नॅरेटिव असून जिहादी मंडळी याचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow