एसआयटी अहवालात चंपत राय क्लीन चिट
चढावा चोरी प्रकरणात फक्त आठच आरोपी, अयोध्या रामकोट भवनात २१ नोव्हेंबरपर्यंत चंपतराय यांची चातुर्मास साधना
(विजयकुमार पिसे)
अयोध्या : राम मंदिर चढावा चोरी प्रकरणात महासचिव चंपत राय यांनाच लक्ष्य केले होते. यासंदर्भात एसआयटीचा चौकशीअंती अहवाल आला असून ज्यांच्यावर सर्वाधिक आरोप झाले होते, त्यामध्ये चंपत राय यांना एसआयटीने क्लीन चिट दिली आहे. दरम्यान चंपत राय रामकोट भवनात चातुर्मास मौन व्रत साधनेत व्यस्त आहेत.
अयोध्येतील राम मंदिरातील चढावा चोरी प्रकरणात संघ, विहिंप यांना लक्ष्य करणारा नॅरेटिव्ह देशभरात केला गेला. यामुळे देशभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या. पण शेवटी अग्नी परीक्षेत दूध का दूध...हेच समोर आले. तसेच माध्यमांनीही मिडिया ट्रायल चालवला. निंदनीय आरोप केले गेले. ते सारे तोंडघशी पडले आहेत.
राम मंदिर दान चोरी प्रकरणात आज मंगळवारी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणार्या विशेष तपास पथकाच्या अहवालाकडे सार्यांचे लक्ष होते. एसआयटीने श्रीराम जन्मभूमी मंदिराचे माजी महासचिव चंपत राय यांना क्लीन चिट दिली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या गृह विभागाने एसआयटीची स्थापना केली होती. वास्तविक राम मंदिर ट्रस्टनेच अशा चौकशीची मागणी केली होती. या अहवालात चंपत राय यांचे नाव आरोपी म्हणून कुठेही नाही. चंपत राय यांना हा मोठा दिलासा आहे.
दरम्यान या अहवालात एसआयटीनं केवळ आठ जणांना आरोपी ठरवले आहे. अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, रमाशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव, रमाशंकर यादव ऊर्फ टिन्नू यांच्या नावांचा समावेश अहवालात आहे. मात्र अनिल मिश्रा अद्याप चौकशीच्या फेर्यात आहेत.
दरम्यान चंपत राय अयोध्येच्या रामकोट तीर्थ क्षेत्र भवनात चार महिने चार्तुमास साधना सुरू करत आहेत. २१ नोव्हेंबरपर्यंत अयोध्येत राहून राम मंत्राचा जप आणि रामचरितमानस पठण करण्याची घोषणा त्यांनी केली होती.
What's Your Reaction?