शिक्षकमध्ये भाजपने प्रथमच खाते उघडले; पदवीधरांनी पुरोगामी विचाराचा आयात उमेदवार नाकारला

जय भाजपा, तय कार्यकर्ता! लादलेल्या उमेदवारामुळे सलग दुसर्‍यांदा हार, पुणे सोलापूरकरांची नाराजी पुन्हा भोवली; हे यश, अपयश दादांच्या नावावर कोरले जाईल?

Oct 29, 2026 - 10:25
 0  3
शिक्षकमध्ये भाजपने प्रथमच खाते उघडले; पदवीधरांनी पुरोगामी विचाराचा आयात उमेदवार नाकारला

(विजयकुमार पिसे)
  पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचा मास्टर स्ट्रोक? अशी बातमी ६ ऑक्टोबरला प्रसिध्द झाली होती. लक्ष्यवेधचा अचूक नॅरेटिव्ह २२ दिवसांनी आणि ३२ तासांच्या मतमोजणीनंतर खरा ठरला. 'पुरोगामी विचाराचा काँग्रेसी आयात उमेदवार' "भाजपाची विचारधारा मानणारा पदवीधर" कसा स्वीकारेल? 'जय भाजपा, तय भाजपा' हेच अपेक्षित असते, पण यंदा 'तय कार्यकर्ता' हे अधोेरेखित झाले आहे.
    लादलेला उमेदवार पदवीधरमध्ये चालत नाही, असे दुसर्‍यांदा झाले. शिवाय पुणे,सोलापूरकरांची नाराजी भाजपाच्या शिक्षण सम्राट डॉ.स्मिता जाधवांना भोवली. हे अपयश असले तरी शिक्षक मतदारसंघात भाजपाने प्रथमच खाते उघडले ही मोठी जमेची बाजू मानता येईल. जाता जाता...शरद पवार साहेबांचे वयोमान वाढले तरी 'शेलार मामा' चमत्कार करू शकतो. असो..
   शिक्षणतज्ञ उच्च शिक्षित डॉ.स्मिता जाधवांची २२ दिवसांपूर्वी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोलापूर, पुणे भागात त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेचं ना स्वागत, ना जल्लोष झाला. मतदार आणि कार्यकर्त्यांना नेहमीसाठीच गृहित धरले की, होते काय? तो हा निकाल सांगतो. परिणामी स्मिता जाधवांवर हर्षदा देशमुखांनी मात केली. यानिमित्ताने पदवीधरमध्ये पहिली महिला जिंकली, हा मास्टर स्ट्रोक. 
    कोल्हापूर,पुण्यातील शिक्षण सम्राटांची कन्या आणि नामवंत दैनिकाच्या मालकांची सून स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर पुण्यात भाजपा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. म्हणजे आधी तिकीट मग इनकमिंग. तीच स्थिती शिक्षक मतदारसंघाची कोल्हापुरातील नामचीन शिक्षण सम्राटाच्या संस्थेत 'नातू कम' सीईओ म्हणून कार्यरत कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी. इथे गावडे तरले, जाधव हरले. पुणे पदवीधरची जागा गतवेळी राष्ट्रवादीने (अरुण लाड) जिंकली होती, त्यामुळे महायुतीमध्ये त्यांचा इथे दावा होता. तर शिक्षकमध्ये शिंदे सेनेचा दावा होता. युतीमधील या दोन 'डाव'खरांनी भाजपाविरोधात 'डाव' खेळला. 'सकाळ' आणि 'पुढारी'कार ही पारंपरिक... मिडिया. सातारची रयत शिक्षण संस्था पवार साहेबांच्या ताब्यात. संपूर्ण महाराष्ट्रात रयत संस्थेचा दबदबा. रयतमुळे बारामतीचे संपूर्ण पवार कुटुंंबिय या निमित्ताने एकत्र आले. सतेज/बंटी पाटलांनी, विरोधात भाची असली तरी इथेही 'गोकुळ' करणारच. असा दावा करताना हा माझ्या राजकीय करिअरचा प्रश्‍न आहे, असा मार्मिक सवाल केला होता. म्हणजे शरद पवार असोत वा डी.वाय. पाटील परिवार. त्यांनी 'वैचारिक' भूमिकेशी कसलीच तडजोड केली नाही. हे लक्षात घेणे क्रमप्राप्त आहे.  


   चंद्रकांतदादा पाटील समर्थक राजेश पांडे, माणिक पाटील चुयेकर, मकरंद देशपांडे आणि रोहन देशमुख (सोलापूर), नरेंद्र काटीकर तसेच सांगलीचे लाडके शरद लाड असे ह्या शर्यतीमधील क्वालिफिकेशन उमेदवार बेदखल केल्यामुळे निवडणूक प्रचारात कुठेच जान दिसली नाही. शिवाय एका मंत्र्यानी पदवीधर मतदार नोंदणीसाठी सोलापूरच्या कार्यकर्त्यांची लक्षपती विकास निधीची घोषणा केली होती. पण काही नवे कोरे आरंभशूर नगरसेवकांनी उत्साह दाखवला. तो देखील व्हाटसअपमध्येच. प्रत्यक्षात मतदारांच्या घरापर्यंत किती गेला हा कळीचा प्रश्‍न आहे. एक नवीन गोष्ट खटकली लक्ष्मीदर्शनाची. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात दिवाळीच्या तोंडावर काही हजारात लक्ष्मीदर्शन अनेकांना रुचले नाही. 
   न पेक्षा... मतदार नोंदणीत दक्षिण सोलापूर पुढे, शहर उत्तर दुसर्‍या क्रमांकावर तर शहर मध्यची... कारण उमेदवारी सोलापूर वा पुण्याच्या पदरात पडणारच नाही, ओरिजनल कार्यकर्त्यांनाही संधी मिळणार नाही. त्यामुळे अशा प्रामाणिक कार्यक़र्त्यांना ह्या निवडणुकीशी काही देणे घेणे नव्हते. त्यामुळे तेव्हा असा निष्कर्ष असा काढला जात होता की.. पक्षाच्या नावावर, कार्यकर्ता जुना निष्ठावंत असो वा इनकमिंग. त्याच्या या क्वालिफिकेशनवर यंदाची ही निवडणूक जिंकता येईल याची खात्री नसावी. शिक्षण सम्राटच रिंगणात उतरवला तर हा उमेदवार अपने खुद के बलबुते पर....! पण शेवटी आयात आणि लादलेला पुरोगामी उमेदवार जिंकला तर नाहीच...! 
   आज निकाल जाहीर झाल्यानंतर कौस्तुभ गावडेंच्या यशाबद्दल सोलापुरी भाजपाने भुलाभाई चौकात गुळमुळीत जल्लोष केला. यावेळी जल्लोषकारांनी दुष्काळाचे कारण सांगितले म्हणे. शतप्रतिशत यश गृहित धरलेल्या उमेदवार स्मिता जाधव या अनपेक्षितपणे पराभूत झाल्या. हे दुष्काळी जल्लोषाचे खरे कारण होय.
शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे त्यांच्या रूपाने भाजपाने प्रथमच खाते उघडले आहे. त्यामुळे गावडे यांचे विशेष अभिनंदन. तसेच गतवेळी भाजपाची पाटी कोेरी होती. यंदा दोन जागा खिशात घातल्या. आणि दोन्ही (पुणे/नागपूर) ठिकाणी 'काँग्रेस'लाच नमविले. नागपूरची पारंपरिक गमावलेली जागा भाजपाने पुन्हा मिळवली. याबद्दल देवेंद्र फडणवीसांचे विशेष अभिनंदन!
  पुणे विभागातील यश आणि अपयश दादांच्या नावावर लिहिले जाईल. चला उठा वेळ झालीय! मात्र उमेदवार जर आपल्या 'विचार'धारेचे नसतील तर.. मतं घालायची काँग्रेसला, असं का? हा भाजपा विचाराच्या मतदारांचा प्रामाणिक आणि विनयपूर्वक़ सवाल. त्यामुळेच पुन्हा  पडला. हाच तो मास्टर स्ट्रोक!   
............

  • जय भाजपा, तय कार्यकर्ता!
  • ...याबद्दल देवेंद्र फडणवीसांचे विशेष अभिनंदन. 
  • युतीमधील या दोन डावखरांनी भाजपाविरोधात डाव खेळला.
  • यश आणि अपयश चंद्रकांत दादांच्या नावावर 
  • गृहित धरले की होते काय? तो हा निकाल सांगतो. 
  • पवार साहेब.. शेलार मामा। चमत्कार करू शकतात.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow