म. फुले जन्म द्विशताब्दी; रविवारी दत्ता देसाई यांचे व्याख्यान
सोलापुरात महात्मा जोतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दीनिमित्त आयोजित प्रबोधनपर्व व्याख्यानमालेचे चौथे पुष्प रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी गुंफले जाणार आहे. प्रसिद्ध विचारवंत कॉ. दत्ता देसाई यांचे ‘महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष’ या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार असून, अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य दादा चांदणे असतील. नागरिकांनी या प्रबोधनपर कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
सोलापूर : महात्मा जोतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दीनिमित्त प्रबोधनपर्व उपक्रमात रविवारी १८ ऑक्टोबर रोजी व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफले जाणार आहे.
प्रसिद्ध विचारवंत कॉ. दत्ता देसाई यांचे व्याख्यान होईल. त्यांच्या व्याख्यानाचा विषय महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष आहे.
हा कार्यक्रम डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सायंकाळी 6 वाजता आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य दादा चांदणे असतील, अशी माहिती म. फुले जन्म द्विशताब्दी समितीने दिली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ. दत्ता देसाई यांनी १९९० च्या दशकात बँकेतील नोकरी सोडून पूर्णवेळ सामाजिक कार्यास वाहून घेतले आहे. त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध समाज विज्ञान अकादमीचे सचिव म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. त्यांनी भारत ज्ञानविज्ञान समिती, भारतीय जनविज्ञान आंदोलन आदी माध्यमांतून साक्षरता, जनवाचन आंदोलन, दुष्काळ निर्मूलन आदी चळवळी उभ्या केल्या. त्यांनी आधुनिकतेचे आगमन – युरोपकेंद्री इतिहासाचा जागतिक विचार, जलयुद्ध की क्रांती, महाराष्ट्रातील विकासाची दिशा – हवी नवी मळवाट आदी पुस्तके लिहिली आहेत. तसेच त्यांनी बदलता भारत या दोन खंडातील बाराशे पानांच्या ग्रंथाचे संपादन केले आहे.
यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष माजी प्राचार्य नरेश बदनोरे, उपाध्यक्ष प्रा. एम. आर. कांबळे, लक्ष्मीदास सोनकवडे, कार्याध्यक्ष शंकर पाटील, कोषाध्यक्ष अॅड. गोविंद पाटील, सचिव अॅड. मनीष गडदे उपस्थित राहणार आहेत. सोलापूरकरांनी प्रबोधनाच्या या जागरात सामील व्हावे, असे आवाहन संयोजन समितीने केले.
What's Your Reaction?