28.57कोटी कर्जवसुलीसाठी माजी मंत्री म्हेत्रे, शिंदे परिवाराच्या 6 प्रॉपर्टीजचा युनियन बँकेकडून लिलाव/विक्री
धोत्रीच्या गोकुळ शुगरकडे 28कोटी 57लाख 66हजाराची थकबाकी, उस बिलासाठी दोनच दिवसांपूर्वी तरुण शेतकर्याची आत्महत्या

विजयकुमार पिसे)
अक्कलकोट तालुक्यातील पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते व अलीकडेच शिंदे सेनेत प्रवेश केलेले माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे आणि राष्ट्रवादीचे शिंदे यांच्या गोकुळ शुगरकडे युनियन बँकेची 28.57 कोटींचे थकीत कर्ज असून कर्जवसुलीसाठी बँकेने म्हेत्रे आणि शिंदे परिवाराच्या सहा प्रॉपर्टीज येत्या 29 ऑगस्ट रोजी लिलाव/विक्रीस काढली आहे. म्हेत्रे शिंदे सेनेत गेलेत, तर शिंदे भाजपाशी संधान साधून आहेत. ही मंडळी सत्ताधारी पक्षाकडे गेली तरीही त्यांच्या साखर कारखान्याच्या थकीत कर्जाच्या वसुलीचा ससेमिरा थांबलेला नाही.
दरम्यान दुधनी/रूद्देवाडी येथील मातोश्री लक्ष्मी शुगरकडे पंजाब नॅशनल बँकेची 75 कोटी 69 लाख रुपयांची थकबाकी असून यापोटी बँकेने म्हेत्रे आणि शिंदे परिवार यांच्या अक्कलकोट आणि सोलापूर येथील प्रापर्टीचा प्रतीकात्मक ताबा यापूर्वीचा घेतला असे बँकेने जाहीर केले आहे.
युनियन बँकेने जशी आहे तशी या तत्वावर 29 ऑगस्ट रोजी स्थावर आणि जंगम मालमत्ता विक्रीसंबंधी लिलाव पुकारला आहे. यामध्ये कर्जदार, सहकर्जदार व हमीदारांची नावे असून सिध्दाराम म्हेत्रे, सौ उषा भगवान शिंदे, लक्ष्मी गणपत शिंदे, कै.भगवान शिंदे यांचे अन्य.., वारस गीता शिंदे (मुलगी), स्व.सुवर्णा म्हेत्रे यांचे वारस पती सिध्दाराम व मुलगा शिवराज म्हेत्रे, स्व.अंजनाबाई दत्तात्रय शिंदे यांचे वारस गोकुळ शिंदे (मुलगा), गणपत दत्तात्रय शिंदे (मुलगा) तसेच दत्तात्रय शिंदे, गणपत द.शिंदे,शिवराज सि.म्हेत्रे, कल्पना गोकुळ शिंदे, प्रीती दत्ता शिंदे, धीरज गो.शिंदे, कपिल ब.शिंदे, स्व.बलभीम द.शिंदे यांचे वारस कपिल ब.शिंदे असे एकूण 16 जण आहेत.
1)शिवराज म्हेत्रे यांच्या मालकीचा (926 चौ. यार्ड भूखंड) क्रॉस रोड सोलापूर, 2)शिंदे परिवाराचा लकी चौकातील मोनालिसा चेंबर्स येथील फ्लॅट, 3)सात रस्ता रेल्वे लाईन्स येथील विद्या विहार अपार्टमेंट येथील फ्लॅट क्र.डी1,डी5,डी6,डी10 असे एकूण सहा प्रॉपर्टीजचा विक्रीसाठी युनियन बँकेने लिलाव पुकारला आहे. यासंदर्भात बँकेचे संंबधित अधिकारी मनीषकुमार सिन्हा (मो.सं.8882527394) हे सदर प्रक़रण हाताळत आहेत.
म्हेत्रे यांनी, शेतकरी उस बिलाच्या थकीत रक्कम अदा न केल्यामुळे उस पुरवठा करणार्या शेतकर्यांनी गतवर्षी काँग्रेस भवन आणि म्हेत्रे यांच्या निवाससमोर आंदोलन केले होते. विरोधक़ांचा हा राजकीय कावा आहे, असे स्पष्टीकरण म्हेत्रे करायचे. तरीही बँकेने कारवाई केलीच. दरम्यान सिध्दाराम म्हेत्रे तीन महिन्यापूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडले व सत्ताधारी शिंदे सेनेत गेले. तरीही त्यांच्या मागचे अनेक शुक्लकाष्ठ थांबले नाहीत.
*मातोश्री शुगरचीही थकबाकी...*
अक्कलकोट तालुक्यातील रूद्देवाडी येथे म्हेत्रे यांच्या मातोश्रींच्या नावाने मे. मातोश्री लक्ष्मी शुगर कारखाना कार्यरत असून माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे अध्यक्ष आणि गोकुळ शिदे उपाध्यक्ष, दत्ता शिंदे व्यवस्थापकीय संचालक, शिवराज म्हेत्रे संचालक, मयत सातलिंगप्पा म्हेत्रे संचालक आहेत. याशिवाय शिंदे परिवारातील गणपत द. शिंदे, बलभीम द.शिंदे, कुसुम ग. शिंदे, शोभा ब.शिंदे, कपिल ब.शिंदे हे जामीनदार/गहाणदार आहेत. या सर्वावर पीएनबी बँकेने गतवर्षी 26 ऑगस्ट 2024 रोजी नोटीस बजावली होती.
What's Your Reaction?






