जिल्हापरिषदेच्या डेप्युटी सी.ई.ओ. स्मिता पाटील चौकशीच्या कचाट्यात
शिक्षण उपसंचालक आहीरे यांचे आदेश जारी....!

सोलापूर: साेलापुर जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी सी.ई.ओ.) स्मिता पाटील यांच्याविरोधात पुण्याच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने चौकशीचे आदेश जारी केले आहेत. २ ऑगस्ट २०२४ रोजी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तत्कालीन माध्यमिक शिक्षणधिकारी मारूती फडके हे रजेवर गेल्यानंतर डेप्युटी सी.ई.ओ. स्मिता पाटील यांच्याकडे प्रभारी माध्यमिक शिक्षणधिकारीचा पदभार देण्यात आला.
कार्यभार सांभाळत असताना वैयक्तिक शिक्षकांना मान्यता दिल्या होत्या. या मान्यतेविरोधात पुणे येथील छात्र कृती समिती उपाध्यक्षांनी तक्रार अर्ज विभागीय शिक्षण संचालक
११ जुलै २०२४ रोजी दाखल केला होता.
या तक्रार अर्जाची दखल घेत उपसंचालक राजेंद्र आहीरे यांनी माध्यमिक शिक्षणधिकारी सोलापूर यांना स्मिता पाटील यांच्या कार्याकाळातील प्रशासकीय टिपण्या, शिक्षक वैयक्तिक मान्यता प्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन आहवाल सादर करण्याचे आदेश दिला आहे.
याबाबत शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहीरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमबाह्य मान्यता देताना टिपणी टाकणाऱ्या कर्मचाऱ्यापासून ते अंतिम आदेश पारित करणाऱ्या स्मिता पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी) सोलापूर शिक्षणाधिकारी, (माध्य.) जि.प. सोलापूर यांनी दिलेल्या मान्यतेबाबतची चौकशी करुन फौजदारी गुन्हा कारवाई करण्याबाबत उपाध्यक्ष, छात्र शिक्षक कृती संस्था, पुणे यांनी ११ जुलै, २०२४ निवेदन कार्यालयास केलेले आहे.
त्या अनुषंगाने चौकशी करण्यात येत असल्याचे शिक्षण उपसंचालक आहीरे म्हणाले.
दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर डेप्युटी सी.ई.ओ. स्मिता पाटील यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
What's Your Reaction?






