शतक आम्ही पाहिला...तुम्ही।
संघकार्याच्या शंभर वर्षं प्रवासाची झेप, 160 स्वयंसेवकांनी पाहिला प्रेरणादायी प्रवास, चित्रपटगृहात संघाची प्रार्थना देखील म्हटली
सोलापूर | रा.स्व.संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नुकताच प्रदर्शित झालेल्या शतक चित्रपटास सोलापुरात चांगला प्रतिसाद मिळाला असून संघकार्याच्या शंभर वर्षांचा प्रेरणादायी प्रवास असलेल्या चित्रपटास तब्बल 160 स्वयंसेवकांनी एकाच वेळी हजेरी लावली. शतक चित्रपट आम्ही पाहिला, तुम्ही देखील पहा, असे आवाहन चित्रपटगॄहात उपस्थित 160 स्वयंसेवकांनी केले आहे.
शहरातील मीना मल्टिप्लेक्समध्ये शतक चित्रपटास संघाचे स्वयंसेवक, संघप्रेमी नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघकार्याचा अभिमान व्यक्त केला. संघाच्या स्थापनेपासून गत शंभर वर्षात सामाजिक, सेवा आणि राष्ट्रीय कार्यात संघाची भूमिका शतक चित्रपटातून प्रभावीपणे मांडली आहे. संघ संस्थापक डॉ.हेडगेवार यांच्या विचारांचा वारसा, स्वयंसेवकांची शिस्त, समाजाभिमुख उपक्रम आणि राष्ट्रप्रेमाची भावना यांचे जिवंत चित्रण या चित्रपटातून पाहायला मिळते. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येकांनी सहकुटुंब पहावा असे आवाहन करण्यात आले. चित्रपट संपल्यानंतर संघ स्वयंसेवकांची प्रार्थना झाली. हा क्षण भारावून टाकणारा होता. संघ स्वयंसेवक अशोक संकलेचा, व्यंकटेश कंची, प्रसाद जिरांकलगीकर, अनिल गुल्लापल्ली, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, नगरसेवक सतिश सिरसिल्ला, श्रीधर आरगोंडा, चन्नेश इंडी, चेतन कोटा, वैभव नल्ला यांच्यासह अनेक स्वयंसेवक, महिला व परिवारातील सदस्य उपस्थित होते.
1925 पासून सुरू झालेली संघाची वाटचाल, समाजसेवा, राष्ट्रनिर्माण आणि संस्कार घडवण्याचे कार्य या चित्रपटातून मांडण्यात आले आहे,असे मत नागराज रासकोंडा यांनी व्यक्त केले.
संघ शताब्दीनिमित्त हा चित्रपट प्रदर्शित होणे आमच्यासाठी अभिमान आहे. शंभर वर्षांच्या प्रवासात हजारो स्वयंसेवकांचे समर्पण असून त्या सर्वांना अभिवादन आहे,अशा भावना अनिल गुल्लापल्ली यांनी व्यक्त केल्या.
शतक चित्रपट संघाच्या विचारांचा आणि कार्याचा साक्षीदार आहे. नव्या पिढीला प्रेरणादायी व राष्ट्रभक्तीची जाणीव अधिक दृढ करणारा आहे,असे मतश्रीधर आरगोंडा यांनी नमूद केले.
शतक चित्रपटातून संघाची शिस्त, संघटन आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श पहावयास मिळाला. समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा यातून मिळेल,असे चंद्रकांत जक्कन यांनी सांगितले.
What's Your Reaction?