मानेगावात पालावरची "इंद्र"कडून दिवाळी; शिधा वाटपाचा उपक्रम
प्रमुख बाजारपेठेतून आज भव्य मोर्चा; दिवाळीमुळे व्यापारी वर्ग, ग्राहक अस्वस्थ,*बीजेपीचा 'व्होकल' for 'लोकल' नारा
सोलापूर: दीपावली निमित्त मानेगाव (ता. माढा जि. सोलापूर) येथील डोंबारी समाजाच्या पालावर इंद्र फाउंडेशन (मुंबई) यांच्याकडून दिवाळीच्या सणाचे साहित्य, शिधा देण्यात आला. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून "पालावरची दिवाळी" हा उपक्रम राबविण्यात आला.
दीपावली शिधामध्ये साखर, पोहे, रवा, चकली पीठ, गहू, डालडा, मनुके, आणि शेंगदाणे इत्यादी वस्तूंचा समावेश होता. या कामी सामाजिक कार्यकर्ते श्री वामन बावळे यांनी पुढाकार घेत कार्यक्रमाचे नियोजन केले होते. विश्व हिंदू परिषदेचे प.महाराष्ट्र प्रांत धर्माचार्य संपर्क सहप्रमुख नागनाथ बोंगरगे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या शुभ हस्ते दिवाळी वस्तूंचे किट वितरण करण्यात आले.
यावेळी डोंबारी समाजातील कुटुंबिय, परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळी शिधा वाटप कार्यक्रमाचे आभार डोंबारी समाजाचे श्री. सोपान पवार यांनी मानले. या कार्यक्रमामुळे आणि दिवाळीच्या आधीच वस्तू व साहित्य मिळाल्याने डोंबारी समाजातील स्त्री-पुरुष कुटुंबिय यांच्या चेहऱ्यावर हास्य व समाधान फुलून आल्याचे दिसले.
यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असताना डोंबारी कुटुंबिय यांचे खेळ बंद पडले असताना केवळ मजुरीवर प्रपंच भागवण्यासाठी धडपडणारे, पण मजुरी वेळेवर न मिळाल्याने अनेकांची उपासमार होत होती. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून इंद्र फाउंडेशन (मुंबई) यांच्या मदतीबद्दल सर्व पालावर उत्साही वातावरण होते. गतवर्षी महापुराच्या संकट कालावधीतही विश्व हिंदू परिषदेने अनेक ठिकाणी आपद्ग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला होता. याची आठवण आपद्ग्रस्तांनी यावेळी करून समाधान व्यक्त केले.
What's Your Reaction?