रविवारी ७ सप्टेंबरला साडेतीन तासांचं चंद्रग्रहण; ९ तासांचा सुतक काळ, 'ही' ५ कामे चुकूनही करू नये

वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण : भारतात चंद्रग्रहण दिसणार असल्याने ग्रहांचा जाणवणार परिणाम

Sep 1, 2025 - 13:24
 0  844
रविवारी ७ सप्टेंबरला साडेतीन तासांचं चंद्रग्रहण; ९ तासांचा सुतक काळ, 'ही' ५ कामे चुकूनही करू नये

सोलापूर : रविवार ता.७ सप्टेंबर २०२५ रोजी वा वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होत आहे. भारतात हे चंद्रग्रहण दिसणार असल्याने ग्रहांचा परिणाम जाणवणार आहे. ९ तासांचा सुतक काळ असून साडेतीन तासांचं हे चंद्रग्रहण असणार आहे. ग्रहण पर्वात 'ही' ५ कामे चुकूनही करू नये, असे असे ज्योतिष अभ्यासकांनी सांगितले आहे.

७ सप्टेंबर २०२५ रोजी होणा-या चंद्रग्रहणचा सुतक काळ ९ तासांचा असणार आहे. हा सुतक काळ अशुभ काळ मानला जातो. या काळात अनेक कामे आहेत जी करण्यास सक्त मनाई केली जाते अन्यथा त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. ग्रहणाचा प्रभाव कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे. या वर्षीच्या भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही तारीख खूप खास आहे. विशेष कारण या दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील होणार आहे. वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. हे ग्रहण रात्री ९.५८ वाजता सुरू होईल आणि १.२६ वाजता संपेल. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याचं म्हटलं जातं. ज्यामुळे ग्रहणाचा परिणाम संपूर्ण देशात जाणवणार आहे. ग्रहणाचा काळ हा सुतक काळ म्हटला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण हा एक अशुभ काळ मानला जातो. हा सुतककाळ ९ तासांचा असणार आहे. सुतककाळ हा ग्रहणाच्या ९ तास आधी सुरु होतो. म्हणजे या ग्रहणाचा सूतक काळ दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होईल. त्यामुळे वा ९ तासात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणात्त्वा सुतक काळात अशी काही कामे आहेत, जी करण्यास सक्त मनाई केली जाते.

ग्रहणात 'ही' करा कृत्ये : पंचागकर्ते मोहन दाते

ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन व कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणसंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते, असे सल्ला दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी ग्रहणासंबंधी दिला आहे.

ग्रहणासंबंधी अधिक माहिती

पुण्यकाल - ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काळ पुण्यकाल आहे. वेधारंभ हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरु होत असल्याने ३ प्रहर आधी म्हणजे दुपारी १२:३७ पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत, मात्र वेधकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप घेणे ही कर्मे करता येतात. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी सायंकाळी ५:१५ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. ग्रहण पर्वकाळ म्हणजे रात्री ९:५७ ते १:२७ या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करु नयेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow