२०१४ नंतर देशात पुनःपरिवर्तन! प.बंगाल, केरळम्, तमिळनाडूत सत्तांतर
ममता,माकपाचा किल्ला ४० वर्षानंतर भेदला!निवडणुकीत महाराष्ट्र पॅटर्न; संत,महंत, धर्माचार्य यांचे मतदार प्रबोधन
(विजयकुमार पिसे)
संघ परिवाराची संपर्क, संवाद आणि सत्संग नीतीचे सातत्य सूत्रबद्ध कार्यपद्धतीचे यश किती कालांतराने मिळते, याचे उदाहरण म्हणजे प.बंगालमधील दिग्विजय. २०१४ नंतर देशात पुनः परिवर्तन झाले आहे. भाजपाचे मोटाभाईनी मायक्रोप्लॅन २०१४ पासून सुरू केले होते. याची ना चर्चा,ना माहिती,ना प्रसार. त्यामुळे हे परिवर्तन अनपेक्षित, धक्कादायक नव्हे तर, ती राबवलेली रणनीती व कार्यपद्धती होय. त्यामुळेच तब्बल ४० वर्षानंतर माकपा,ममता दिदी यांचा किल्ला भेदला गेला.
म्हणून पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या अध्यायाची सुरुवात होताना दिसत आहे. बंगालमध्ये गेली ४ दशकं डाव्यांची अभेद्य भिंत आणि त्यानंतर ममता बॅनर्जींचा करिष्मा अनुभवला, तिथे आज भाजपचा भगवा फडकत आहे.
केरळम् येथे १० वर्ष डाव्यांचे तर तमिळनाडूत जयललिता अस्तानंतर अद्रमुकला छेद गेला. तिथेही सत्तांतर झाले आहे. विशेष म्हणजे पराभूत झालेले तीनही पक्ष प्रादेशिक. त्यामुळे या परिवर्तनाला विशेष अर्थ आहे.
प.बंगालमधील निकाल अनपेक्षित असेल पण राजकीय अभ्यास केला तर हा विजय म्हणजे योगायोग नव्हे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेली १२ वर्षे याठिकाणी मायक्रो-प्लॅनिंग आखले होते. आणि या निवडणुकीत महिनाभर तळ ठोकला होता. प.बंगालच्या या विजयाचा पाया २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतच भरला गेला होता. २०१४ मध्ये देशात नरेंद्र मोदींची लाट आली. तेव्हा अमित शाह उत्तर प्रदेशचे प्रभारी होते. तिथे अभूतपूर्व यश मिळाले. त्याचवेळी शाह यांच्या मनात काहीतरी वेगळेच सुरू होते. भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी यासंदर्भात खुलासाही केला आहे.
२०१४ चा मोदी विजय आणि सत्तांतर नंतरच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत शाह म्हणाले, भाजपचा खरा विजय तेव्हाच मानला जाईल, जेव्हा आपण पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करू. २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच, अमित शाह यांनी ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांना 'फोकस स्टेट्स' म्हणून निवडले होते. बंगाल सारख्या कठीण राज्यात पाय रोवण्यासाठी शाह यांनी विश्वासू आणि अनुभवी नेत्यांची फळी तयार केली. ही 'कोअर टीम' तेव्हापासून बंगालच्या कानाकोपऱ्यात सक्रिय होती.
या निवडणुकीचे विशेष प्रभारी बन्सल होते. त्यांनी बूथ स्तरावर पक्षाचे संगठन भक्कम केले. उत्तर प्रदेशात शाह यांचे समवेत त्यांच्या अनुभवाचा यंदा बंगालमध्ये मोठा फायदा झाला.
भूपेंद्र यादव सप्टेंबरपासून बंगालमध्ये तळ ठोकून होते. *आठवा.. भूपेंद्र यादव महाराष्ट्रात निवडणूक प्रभारी होते. स्थानिक प्रश्नांची आणि जातीय समीकरणांची मांडणी केली. तर सोशल मिडियाचे अमित मालवीय यांनी माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मीडियातून तृणमूल काँग्रेसच्या, ममता दीदींच्या प्रचाराला रोखठोक प्रत्युत्तर दिले. शिवाय स्थानिक पातळीवर सुवेंदू अधिकारी यांचे नेतृत्व उभे केले.
संघ परिवाराने राम जन्मभूमीत मंदिराची उभारणी केली. अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घडवले. महाराष्ट्राप्रमाणे संत,महंत, धर्माचार्य, स्वयंसेवक यांनी गाव,वस्ती येथे मतदारांचे जागरण, प्रबोधन केले.
त्यामुळेच हा विजय केवळ भाषणांच्या जोरावर नाही. केंद्रीय नेतृत्व आणि स्थानिक फळी यांच्यातील समन्वय हे देखील कारण आहे. अमित शाह मोटाभाईनी केवळ आदेश दिले नाहीत, स्वतः बंगालच्या गल्लीबोळांत सभा घेतल्या, लोकांच्या समस्या समजून घेतल्या आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुंकले. हाच संघ परिवार आणि भाजपाचा दिग्विजय होय.
What's Your Reaction?